Suryakumar Yadav vs Shreyas Iyer | IND vs NZ: सूर्यकुमार की श्रेयस.. चौथ्या नंबरवर कोणाला बॅटिंग? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar-Yadav-Shreyas-Iyer

भारताची उद्यापासून न्यूझीलंड विरूद्ध कसोटी मालिका

IND vs NZ: सूर्यकुमार की श्रेयस.. चौथ्या नंबरवर कोणाला बॅटिंग?

IND vs NZ, Test Series : भारतीय संघ उद्यापासून न्यूझीलंड विरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २५ ते २९ नोव्हेंबर आणि दुसरी कसोटी ३ ते ७ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. तर संपूर्ण मालिकेसाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्यातच लोकेश राहुलदेखील दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत वरच्या फळीत चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव की श्रेयस अय्यर... कोण फलंदाजी करणार? याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: IND vs NZ : टीम इंडियाला मोठा धक्का; स्टार फलंदाज मालिकेबाहेर

श्रेयस अय्यर पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. अनुभवाचा विचार केल्यास श्रेयस अय्यर हा फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर खेळेल अशी अपेक्षा आहे. पण सामन्याआधीच्या सराव सत्रातून काही वेगळेच संकेत मिळाल्याची चर्चा आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, श्रेयस अय्यर नव्हे तर सूर्यकुमार यादवला सराव सत्रात जास्त वेळ फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहा या दोघांसोबत सूर्यकुमार यादवने फलंदाजीचा सराव केला. आणि श्रेयस अय्यर फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर सराव करताना दिसला.

हेही वाचा: IND VS NZ : रहाणे फॉर्मात येईल : पुजारा

सूर्यकुमार यादव जास्त वेळ फलंदाजीचा सराव करताना दिसला. त्यानंतर श्रेयस अय्यर फिल्डिंगचा सराव करताना दिसला. तसेच, त्याने लेग स्पिनचाही सराव केल्याचं दिसलं. सराव सत्राचा थेट संबंध संघ निवडीशी लावता येऊ शकत नाही. पण ज्या प्रकारचा सराव करण्यात आला त्यानुसार चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमारला संधी मिळण्याची संधी श्रेयस अय्यरपेक्षाही जास्त आहे.

हेही वाचा: T20 WC: एक आफ्रिदी दुसऱ्या आफ्रिदीवर संतापला, म्हणाला...

सूर्यकुमार यादवला सुरूवातीस कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले नव्हते. पण लोकेश राहुलच्या मांडीच्या दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर झाला. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आले. याआधी इंग्लंडमध्ये जेव्हा संघातील अनेक खेळाडू दुखापतीमुळे अनफिट होते तेव्हादेखील सूर्यकुमारला इंग्लंडमध्ये राखीव खेळाडू म्हणून पाठवण्यात आले होते.

loading image
go to top