पर्पल कॅप हिरोची टीम इंडियात एन्ट्री, द्रविडनं आगरकरला दिला मान |Harshal Patel T20I Debutants For India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harshal Patel
नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. #IndiavsNewZealand #HarshalPatel #INDvsNZ

पर्पल कॅप हिरोची टीम इंडियात एन्ट्री, द्रविडनं आगरकरला दिला मान

sakal_logo
By
सुशांत जाधव

India vs New Zealand 2nd T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना रांचीच्या मैदानात रंगला आहे. रोहित आणि द्रविड पर्वात आणखी एका खेळाडूनं टीम इंडियात पदार्पण केले. व्यंकटेश अय्यरनंतर हर्षल पटेलच्या हा न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत टी-20 संघात पदार्पण करणारा दुसरा खेळाडू ठरला. भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकरने हर्षल पटेलेला कॅप दिल्याचे पाहायला मिळाले.

वयाची 30 वर्षे आणि 361 दिवसानंतर हर्षल पटेलनं टीम इंडियाकडून पदार्पण केले आहे. तीशी पार केल्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो सहावा खेळाडू आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने वयाची 38 वर्षे आणि 232 दिवस पूर्ण झाल्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला होता.

हेही वाचा: PAK vs BAN 1st ODI: वर्ल्ड कपचा 'व्हिलन' हसन ठरला सामनावीर

तिशी पार झाल्यानंतर टी-20 मध्ये पदार्पण करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानवर आहे. त्याने 33 वर्षे आणि 221 दिवस वयाचा असताना पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला होता. श्रीनाथ अरविंदने 31 वर्षे आणि 177 दिवस, स्टुअर्ट बिन्नीनं 31 वर्षे आणि 44 दिवस, मुरली कार्तिक 31 वर्षे आणि 39 दिवस वयात टी-20 मध्ये पदार्पण केले होते. या खेळाडूंच्या यादीत आता हर्षल पटेलचा समावेश झाला आहे.

हेही वाचा: सिंधू, श्रीकांत, प्रणय यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

आयपीएलमध्ये हर्षल पटेलनं कमालीची कामगिरी करुन दाखवली होती. आयपीएलच्या 14 व्या हंगामात त्याने सर्वाधिक 15 विकेट्स घेत पर्पल कॅप पटकावली होती. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेलनं हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड आणि राहुल चाहरला बाद करत हॅटट्रिकचा पराक्रम केला होता. या सामन्यात त्याने अवघ्या 17 धावा खर्च करत 4 विकेट घेतल्या होत्या. पर्पल कॅपच्या हिरोला अखेरच टीम इंडियाची ब्लू कॅप मिळाली आहे.

loading image
go to top