पदार्पणाच्या सामन्यात हर्षलची हवा; टीम इंडियासमोर 154 धावांचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India
पदार्पणाच्या सामन्यात हर्षलची हवा; टीम इंडियासमोर 154 धावांचे आव्हान

पदार्पणाच्या सामन्यात हर्षलची हवा; टीम इंडियासमोर 154 धावांचे आव्हान

India vs New Zealand 2nd T20I : रांचीच्या मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियासमोर 152 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मार्टिन गप्टील 31 (15), डॅरेल मिशेल 31 (28), ग्लेन फिलिप्स 34 (21) आणि टिम सेफर्ट 13 (15) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजा दुहेरी आकडा पार करता आला नाही. भारताकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या हर्षल पटेलनं दोन विकेट घेतल्या.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टिन गप्टील आणि डॅरेल मिशेल या जोडीनं न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. या जोडीने संघाचा चांगली सुरुवात करुन दिली. मार्टिन गप्टील आक्रमक तोऱ्यात दिसत होता. पण दीपक चाहरने त्याची विकेट घेत संघाला पहिले यश मिळवून दिले.

हेही वाचा: गुगलचे CEO पिचाई यांचा AB साठी 'सुंदर' मॅसेज

गप्टीलने 15 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 31 धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी आलेला आणि पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या मार्क चॅम्पमॅनला अक्षर पटेलनं स्वस्तात माघारी धाडले. तो 17 चेंडूत 21 धावा करुन परतला. ग्लेन फिलिप्स 31 आणि टिम सेफर्टने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही शेवटपर्यंत मैदानात थांबता आले नाही. न्यूझीलंडच्या एकाही फलंदाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी त्यांचा डाव निर्धारित 20 षटकात 6 बाद 153 धावांत आटोपला. भारताकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या हर्षल पटेलनं दोन विकेट घेतल्या. भुवनेश्वर, अश्विन, अक्षर पटेल आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

हेही वाचा: पर्पल कॅप हिरोची टीम इंडियात एन्ट्री, द्रविडनं आगरकरला दिला मान

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या मैदानात रंगला होता. हा सामना जिंकून भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकून न्यूझीलंडसमोर मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे हा सामना जिंकत भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

loading image
go to top