IND vs NZ : टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर ठेवलं तगडे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Axar Patel
IND vs NZ : टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर

IND vs NZ : टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर ठेवलं तगडे आव्हान

sakal_logo
By
सुशांत जाधव

India vs New Zealand, 3rd T20I : रोहित शर्माचे अर्धशतक आणि त्यानंतर दोन अय्यरनी मिळून केलेल्या 45 धावांच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात टीम इंडियाने 184 धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या षटकात दीपक चाहरने तुफान फटकेबाजी केली. त्याने 8 चेंडूत 21 धावा कुटल्या. हर्षल पटेलनंही 11 चेंडून नाबाद 11 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून सँटनरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

हेही वाचा: IND vs NZ : हिटमॅन रोहितचा विश्वविक्रम; कोहलीला टाकले मागे

रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली. इशान किशन 21 चेंडूत 29 धावा करुन माघारी फिरला. सुर्यकुमार यादवला खातेही उघडता आले नाही. तर पंत अवघ्या 4 धावा करुन माघारी फिरला. या तिघांनाही सँटनरने बाद केले. सोधीनं रोहित शर्माच्या खेळीला ब्रेक लावला. त्याने 31 चेंडूत 56 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर 25 (20), व्यंकटेश अय्यर 20(15) धावा करुन बाद झाले. हर्षल पटेल 11 चेंडूत 18 धावा करुन माघारी फिरला. अखेरच्या षटकात दीपक चाहरने 8 चेंडूत 21 धावा कुटल्या. त्याच्यासोबत अक्षर पटेल दोन धावा करुन नाबाद परतले.

हेही वाचा: Video : सूर्या उगवला कधी अन् मावळला कधी समजलंच नाही

न्यूझीलंडच्या संघात आज मोठा बदल पाहायला मिळाला. साउदीच्या अनुपस्थितीत साउदीने संघाचे नेतृत्व केले. पण त्याला टॉस जिंकता आला नाही. रोहित शर्माने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा कार्यवाहू कर्णधार सँटनरने सर्वाधिक तीन विकेटही घेतल्या. सोधी, लॉकी फर्ग्युसन, मिल्ने आणि बोल्ट यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

loading image
go to top