IND vs NZ : हिटमॅन रोहितचा विश्वविक्रम; कोहलीला टाकले मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma
हिटमॅन रोहितचा विश्वविक्रम; कोहलीला टाकले मागे

IND vs NZ : हिटमॅन रोहितचा विश्वविक्रम; कोहलीला टाकले मागे

sakal_logo
By
सुशांत जाधव

Rohit Sharma Set News Record Against NZ न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने दमदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह त्याने टी-20 मध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. विश्रांतीवर असलेल्या विराट कोहलीला ओव्हरटेक करत त्याने मैलाचा पल्ला गाठलाय. टी-20 क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावे सर्वाधिक 50 + धावा करण्याच्या विक्रमाची नोंद झालीये. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावे होता. कोहलीने 29 वेळा ही कामगिरी केलीये.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 30 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. कोहलीने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात खणखणीत चौकार मारुन खाते उघडले. अर्धशतकही त्याने चौकारानेच पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले. त्याने 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील त्याचे हे 26 वे अर्धशतक आहे.

हेही वाचा: Video : सूर्या उगवला कधी अन् मावळला कधी समजलंच नाही

आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिकवेळा 50 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 29 वेळा ही कामगिरी केलीये. बाबर आझमने 25 वेळा तर डेविड वॉर्नरने 22 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

हेही वाचा: निवड समितीच्या चुकीमुळं इशान किशनला मिळाली सुवर्ण संधी!

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्धचे पहिले दोन सामने जिंकत मालिका आधीच खिशात घातली आहे. ईडन गार्डन्सच्या मैदानातील सामना जिंकून न्यूझीलंडला क्लिन स्विप देण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरली आहे. विराट कोहलीनं टी-20 संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर रोहित शर्माच्या खांद्यावर टी-20 संघाची धूरा देण्यात आली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याने उत्तम कॅप्टन्सी केली. याशिवाय फलंदाजीतही धमक दाखवली.

loading image
go to top