...अन् त्याने द्रविडसह WWE स्टारबद्दल व्यक्त केली मनातील भावना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Cricketer and WWE Star
टीम इंडियाच्या या खेळाडूला द्रविडसह WWE सुपर स्टारकडून मोठी अपेक्षा

...अन् त्याने द्रविडसह WWE स्टारबद्दल व्यक्त केली मनातील भावना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेला जयपूरच्या मैदानात सुरुवात होत आहे. रोहित आणि द्रविड या जोडगोळीसह या मालिकेत ईशान किशन, व्यंकटेश अय्यर आणि ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील. सामन्यापूर्वी बीसीसीआयने व्यंकटेश अय्यरच्या खास मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात व्यंकटेश अय्यरने टीम इंडियात मिळालेल्या संधीबद्दल आपल्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त केल्याचे पाहायला मिळते. या दौऱ्यात राहुल द्रविडकडून खूप काही गोष्टी शिकण्याच्या इराद्याने तो टीम इंडियाच्या ताफ्यात सामील झालाय.

या मुलाखतीमध्ये व्यंकटेश अय्यर म्हणाला की, 'आवेश खानने मला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात निवड झाल्याची बातमी दिली. मी माझ्या रुममध्ये होतो. त्यावेळी आवेश खान आला आणि त्याने दोघांची निवड झालीये ही बातमी सांगितली. आम्ही दोघे दशकभरापासून रुममेट आहोत. आम्ही एकाच असोसिएशनकडून खेळतो. त्यामुळे आवेश खानची निवड झाल्याचा आनंद अधिक होता, असा उल्लेख त्याने या मुलाखतीमध्ये केला.

हेही वाचा: न्यूझीलंडला मोठा धक्का; स्टार खेळाडूची T20 मालिकेतून माघार

तो पुढे म्हणाला, 'राहुल सरांकडून जेवढे शिकता येईल तेवढे शिकण्याचा प्रयत्न करीन. त्यांच्याकडून आम्हाला खूप गोष्टींचे मार्गदर्शन होणार आहे. संघात निवड झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, कोच राहुल द्रविड आणि ऋषभ पंतसोबत चर्चा केल्याची माहितीही त्याने दिली. या सर्वांनी ज्यापद्धतीने माझे स्वागत केले ते आत्मविश्वास उंचावणारे होते. यावेळी त्याने WWE सुपर स्टार अंडरटेकरचा मोठा फॅन असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, लहानपणापासून अंडरटेकर माझा हिरो आहे. तो मला कधीतरी साईन केलेला WWE बेल्ट गिफ्ट म्हणून पाठवेल, अशी भावना त्याने व्यक्त केली.

हेही वाचा: हरभजनच्या संघात भारतापेक्षा पाकिस्तानचे जास्त खेळाडू; पाहा टीम

व्यंकटेश अय्यरने आयपीएलच्या 2021 च्या दुसऱ्या हंगामात लक्षवेधी कामगिरी केली होती. आयपीएलमधील पदार्पणात दमदार कामगिरीने त्याने आपल्यातील क्षमता सिद्ध केली. 10 सामन्यात त्याने 41.11 च्या सरासरीने 370 धावा केल्या होत्या. मोक्याच्या क्षणी गोलंदाजी करु शकतो याची झलकही त्याने तीन विकेट घेऊन दाखवून दिली होती.

loading image
go to top