India vs New Zealand ODI 2026 squad
esakal
Jasprit Bumrah and Hardik Pandya Rested for ODI series vs NZ : भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ११ जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार असून ३ किंवा ४ जानेवारी रोजी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मात्र, या संघातून तीन मोठ्या खेळाडूंना वगळण्यात येणार असल्याचं बोललं जातं आहे. या दिग्गज खेळाडूंमध्ये रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. त्यामुळे क्रिकेटवर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.