

New Zealand's 16-year-old bowler Mason McLoughlin impressed during India's net practice by dismissing Vaibhav Suryavanshi and challenging Abhishek Sharma ahead of the T20 match in Christchurch
esakal
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी क्राइस्टचर्च येथे झालेल्या सरावादरम्यान एका १६ वर्षीय गोलंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एका युवा गोलंदाजाने भारतीय संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला क्लीन बोल्ड केले. इतकेच नव्हे, तर अभिषेक शर्मालाही त्याने आपल्या गोलंदाजीने अडचणीत आणले. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हेदेखील मेसनच्या कामगिरीने प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले.