India vs Pakistan Asia Cup 2025
esakal
आशिया चषकात रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सने धूळ चारली. आशिया चषकातला हा भारताचा दुसरा विजय ठरला. या विजयासह भारताने सुपर ४ मधील त्यांचे स्थानही पक्क केलं. महत्त्वाचे म्हणजे या विजयानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही खेळाडूंचं कौतुक केलं.