India vs Pakistan
esakAL
हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. छोट्या स्वरूपाच्या या स्पर्धेत आज दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. भारतीय संघ यंदा कर्णधार दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळतो आहे, तर पाकिस्तान संघाची धुरा यंदा कर्णधार अब्बास अफरीदीच्या खांद्यावर आहे. हा सामना दुपारी १ वाजून ५ मिनिटांना सुरू होणार आहे.