Ind vs Pak: आशिया कपमधून टीम इंडिया जाणार बाहेर? 2 सामन्यांनी वाढवली डोकेदुखी

India vs Pakistan Asia Cup 2023
India vs Pakistan Asia Cup 2023sakal

India vs Pakistan Asia Cup 2023 : आशिया कप 2023 टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप 2023 च्या तयारीच्या दृष्टीनेही ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. परंतु पावसामुळे सामना आज म्हणजेच 11 सप्टेंबरला होणार आहे. खेळ थांबेपर्यंत टीम इंडियाने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या होत्या. सुपर-4 चे इतर सामने आणि अंतिम सामने कोलंबोमध्येच होणार आहेत.

India vs Pakistan Asia Cup 2023
Asia Cup 2023 Ind Vs Pak : 'रिझर्व्ह डे' चा फायदा नाहीच? भारत-पाकिस्तान सामन्यावर 'हा' मोठा धोका

पुढील एका आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर, कोलंबोमध्ये 60 ते 90 टक्के पाऊस अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत सुपर-4 च्या सर्व सामन्यांवर पावसाचा धोका निर्माण झाला आहे. सुपर-4 चे उर्वरित सामने पावसामुळे रद्द झाले तर टीम इंडिया अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. 2 सामन्यांचे निकाल भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात.

India vs Pakistan Asia Cup 2023
Ind vs Pak : राखीव दिवशी भारत-पाकिस्तान सामना पूर्ण झाला नाही तर... रोहितच्या संघासाठी काय असेल समीकरण?

सुपर-4 मध्ये एकूण 6 सामने होणार आहेत. पहिल्या 2 सामन्यांचे निकाल आले आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. अशा परिस्थितीत सुपर-4 चे उर्वरित 4 सामने रद्द झाल्यास त्याचा थेट फायदा पाकिस्तान आणि श्रीलंकेला होईल.

पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर, 4 सामने रद्द झाले तर पाकिस्तान आणि श्रीलंकेचे 3 सामन्यांनंतर प्रत्येकी 4 गुण होतील. तर भारतीय संघाचे 3 सामन्यांत केवळ 3 गुण होतील आणि बांगलादेशचा 3 सामन्यांत एक गुण असेल. अशा स्थितीत भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकणार नाही आणि अंतिम सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होईल.

India vs Pakistan Asia Cup 2023
World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी आणखी एका संघाची घोषणा, जखमी खेळाडू असेल कर्णधार

टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांच्यासाठीही आशिया कप 2023 महत्त्वाचा आहे. यानंतर 2023 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड कपनंतर द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com