IND vs PAK Asia Cup 2022 Pitch Report
IND vs PAK Asia Cup 2022 Pitch Reportsakal

IND vs PAK Pitch Report : भारत-पाक सामन्यात 'या' संघाला मिळणार खेळपट्टीची मदत

भारत आणि पाकिस्तानचे संघ दुबईच्या मैदानावर ७ दिवसांत दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत.

IND vs PAK Asia Cup 2022 Pitch Report : भारत आणि पाकिस्तानचे संघ दुबईच्या मैदानावर ७ दिवसांत दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया चषकाच्या साखळी फेरीत टीम इंडियाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. आता दोन्ही संघांना सुपर फोरमध्ये मुकाबला करायचा आहे. UAE मध्ये भारतासोबत खेळल्या गेलेल्या 30 सामन्यांमध्ये पाकिस्तानने 20 वेळा विजय मिळवला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने यूएईमध्ये गेल्या 19 सामन्यांमध्ये केवळ 2 टी-20 सामने गमावले आहेत.

टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेहमीच पाकिस्तानवर वर्चस्व राहिले आहे. T20 क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 10 वेळा भिडले आहेत. यापैकी टीम इंडियाने 8 वेळा विजय मिळवला आहे.

IND vs PAK Asia Cup 2022 Pitch Report
IND vs PAK: हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी संघात बदल होणार... - राहुल द्रविड

दुबई हवामान आणि खेळपट्टी

दुबईत पावसाची शक्यता नाही. संध्याकाळी आकाश मोकळे राहील आणि संध्याकाळी तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. वाऱ्याचा वेग सुमारे 10-15 किमी/तास असण्याची शक्यता आहे.

दुबई इंटरनॅशनल स्टेडियमचा ट्रॅक मंद आहे आणि असमान उसळीमुळे गोलंदाजांना मदत होत आहे. मोठे फटके खेळण्याआधी फलंदाजांनी लय मध्ये येणे गरजेचे आहे. येथे चेंडू थोडा जुना झाल्यानंतर फिरकीपटू प्रभावी ठरतात. या सामन्यात जवळपास 160-170 धावा होण्याची शक्यता आहे.

दुबईच्या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांना सर्वाधिक फायदा झाला आहे. दुसऱ्या डावात दवची भूमिका महत्त्वाची आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर दोन्ही कर्णधारांना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतील. जो संघ आधी गोलंदाजी करणार त्याला मदत मिळणार. या खेळपट्टीवर श्रीलंकेचा संघ बांगलादेश संघाने 184 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याचबरोबर भारताने गेल्या आठवड्यात पाकिस्तानसमोर 148 धावांचे लक्ष्यही पूर्ण केले आहे.

IND vs PAK Asia Cup 2022 Pitch Report
Ravindra Jadeja : आशिया कपनंतर गुडघा दुखापतीमुळे जडेजा T-20 World Cup मधूनही बाहेर!

भारत संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हूडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग आणि आवेश खान.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हारिस रॉफ, इफ्तेकार अहमद, शुशादिल शाह, महम्मद नवाझ, महम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, शहनवाझ दहानी, उस्मान कादिर आणि महम्मद हसनैन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com