India vs Pakistan Match Weather Update
esakal
Harmanpreet Kaur and Smriti Mandhana Confident Before Big Clash : महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काल ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील लढत पावसामुळे वाया गेली. मात्र, आज याच ठिकाणी भारत-पाकिस्तान लढत होणार आहे, पण त्यावरही पावसाचे दाट सावट आहे. कोलंबो शहरात काल जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे नाणेफेकही शक्य झाली नाही. सातत्याने पडणाऱ्या या पावसामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय काही तासांतच घेण्यात आला. तसेच ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांना प्रत्येकी एक गुण मिळाला.