Video : सिराजला नाही जमलं ते मैदानात बाहेर 'Ball Boy'ने करून दाखवलं

सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा 'बॉल बॉय' संघात घ्या; मैदानात बाहेर पकडला अप्रतिम कॅच
india vs south africa 1st odi team india Mohammed Siraj drop catch
india vs south africa 1st odi team india Mohammed Siraj drop catch

India vs South Africa 1st ODI Team India Drop Catch : लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा नऊ धावांनी पराभव केला. पावसामुळे उशिरा सुरू झालेला सामना 40 षटकांचा करण्यात आला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार शिखर धवनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने सुरुवात चांगली केली आणि आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरला लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतवले. पण डेव्हिड मिलर आणि हेन्रिक्स क्लासेन यांच्यातील अप्रतिम भागीदारी केली.

टीम इंडियाचे खराब क्षेत्ररक्षणही येथे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 38व्या षटकात टीम इंडियाने लागोपाठ दोन झेल सोडले आणि आफ्रिकेला मोठे धक्के देण्याची संधी गमावली. पण मजेशीर गोष्ट अशी घडली की जेव्हा भारतीय क्षेत्ररक्षक मैदानात झेल सोडत होते, तेव्हा मात्र मैदानाबाहेर उभ्या असलेल्या एका बॉल बॉयने सहज कॅच घेत होता.

india vs south africa 1st odi team india Mohammed Siraj drop catch
IND VS SA : खराब क्षेत्ररक्षण नंतर टॉप ऑर्डर फ्लॉप; टीम इंडियाच्या पराभवाची मुख्य कारणे

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 38व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर डेव्हिड मिलरचा झेल सुटला. तेव्हा पुढच्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला. हा चेंडू थेट सीमापार गेला आणि तिथे उपस्थित असलेल्या बॉल बॉयने हा झेल घेतला. या बॉल बॉयचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या षटकात एकूण दोन झेल सुटले, पहिला मोहम्मद सिराजने झेल सोडला. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर त्याने हेनरिक क्लासेनचा झेल सोडला. चेंडू खूप उंच होता जो त्याच्या हातात आला पण दोन-तीन प्रयत्नांनंतर अखेर हा झेल सुटला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर रवी बिश्नोईने डेव्हिड मिलरचा झेल सोडला.

india vs south africa 1st odi team india Mohammed Siraj drop catch
IND vs SA : संजू एकटा नडला, पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा 9 धावांनी पराभव

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 40 षटकांत 4 गडी गमावून 249 धावा केल्या. डेव्हिड मिलर 63 चेंडूत 75 आणि हेनरिक क्लासेन 65 चेंडूत 74 धावा करून नाबाद राहिला. प्रत्युत्तरात टीम इंडियाला 40 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 240 धावा करता आल्या. संजू सॅमसनने 63 चेंडूत सर्वाधिक 86* धावा केल्या. त्याचवेळी उपकर्णधार श्रेयस अय्यरने 50 धावा केल्या. हेनरिक क्लासेनला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com