IND vs SA 2nd ODI : श्रेयस अय्यरचे दमदार शतक; भारताचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs South Africa 2nd ODI  Live Cricket Score

IND vs SA 2nd ODI : श्रेयस अय्यरचे दमदार शतक; भारताचा विजय

India Vs South Africa 2nd ODI : भारताने दक्षिण आफ्रिकेचे 279 धावांचे आव्हान 7 गडी राखून पार करत मालिकेत 1 - 1 अशी बरोबरी साधली. भारताकडून श्रेयस अय्यरने नाबाद शतकी (113) खेळी केली. तर इशान किशनने 84 चेंडूत 93 धावांची आक्रमक खेळी करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 161 धावांची दमदार भागीदारी रचली. गोलंदाजीत मोहम्मद सिराजने भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या. आफ्रिकेकडून एडेन माक्ररम 79 तर रीझा हेंड्रिक्सने 74 धावांची खेळी केली. मिलरने 34 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या.

भारताचा विजय मालिकेत बरोबरी

श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी चौथ्या विकेटसाठी 73 धावांची नाबाद भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.

श्रेयस अय्यरचे दमदार शतक

श्रेयस अय्यरने चौकार मारत शतक पूर्ण केले. अय्यरचे हे दुसरे वनडे शतक आहे. या शतकाच्या जोरावर भारत विजयाच्या जवळ पोहचला.

209-3 : इशान किशनचे शतक अवघ्या 7 धावांनी हुकले

आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या इशान किशनने भारताला 34 व्या षटकातच द्विशतकी मजल मारून दिली. मात्र फॉर्च्युनने त्याला 93 धावांवर झेलबाद करत त्याचे शतक पूर्ण होऊ दिले नाही. इशान किशन आणि श्रेयस अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी 155 चेंडूत 161 धावांची दमदार भागीदारी रचली.

इशान किशनने गिअर बदलला

भारताने 150 धावांचा टप्पा पार केल्यानंतर इशान किशनने आपला गिअर बदलला. त्याने तुफान फटकेबाजी करत भारताचे द्विशतक 34 व्या षटकातच धावफलकावर लावले.

भारत 150 पार! किशन - अय्यरची अर्धशतके

भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि इशान किशन या दोघांनी अर्धशतके झळकावत भारताला 150 च्या पार पोहचवले.

 IND 96/2 (20) : भारत शंभरच्या जवळ 

इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत भारताला शंभरच्या जवळ पोहचवले.

IND 73/2 (14)  : किशन - अय्यरने सावरले

भारताचे दोन्ही सलामीवीर 48 धावांवर माघारी गेल्यानंतर इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरत भागीदारी रचण्यास सुरूवात केली.

48-2 : सेट झालेला शुभमन गिल झाला बाद

शिखर धवन बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे शुभमन गिलने आपल्या हातात घेतली होती. त्याने काही चांगले फटके मारत भारताला अर्धशतकाजवळ पोहचवले. मात्र कसिगो रबाडाने त्याला 28 धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.

28-1 : पार्नेलने दिला भारताला पिहला धक्का

वेन पार्नेलने भारताचा कर्णधार शिखर धवनला 13 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला.

277-7 : सिराजने केली तिसरी शिकार, भारतासमोर 279 धावांचे आव्हान

मोहम्मद सिराजने आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजला 5 धावांवर बाद करत आफ्रिकेचा सातवा फलंदाज बाद केला. सिराजची ही तिसरी विकेट होती.

 256-6 : शार्दुलने दिला आफ्रिकेला सहावा धक्का

शार्दुल ठाकूरने वेन पार्नेलला 16 धावांवर बाद करत आफ्रिकेला सहावा धक्का दिला.

215-5 : माक्ररमची झुंजार खेळी सुंदरने संपवली

कुलदीपने क्लासेनला बाद केल्यानंतर पुढच्याच षटकात ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने 89 चेंडूत 79 धावांची खेळी करणाऱ्या एडेन माक्ररमला बाद केले.

हेंड्रक्स बाद झाल्यानंतर आलेल्या हेन्रिच क्लासेनने आक्रमक फलंदाजी करत धावगती वाढवण्यास सुरूवात केली होती. मात्र कुलदीप यादवने त्याला 30 धावांवर बाद करत आफ्रिकेला चौथा धक्का दिला.

 169-3 : अखेर सिराजने जोडी फोडली 

रीझा हेंड्रिक्स आणि एडेन माक्ररम यांनी दोघांनी अर्धशतके ठोकत तिसऱ्या विकेटसाठी 129 चेंडूत 129 धावांची दमदार भागीदारी रचली. अखेर ही जोडी मोहम्मद सिराजने फोडली. त्याने हेंड्रिक्सला 74 धावांवर बाद केले.

RSA 150/2 (29) : हेंड्रिक्स - माक्ररमची शतकी भागीदारी

रीझा हेंड्रिक्स आणि एडेन माक्ररम यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचत दक्षिण आफ्रिकेला दीडशतकी मजल मारून दिली.

RSA 137/2 (26.2) : हेंड्रिक्सचे दमदार अर्धशतक

आफ्रिकेच्या दोन विकेट स्वस्तात माघारी गेल्यानंतर भारताविरूद्ध पदार्पण करणाऱ्या रीझा हेंड्रिक्सने दमदार अर्धशतक ठोकत माक्ररमसोबत तिसऱ्या विकेटसाठी जवळपास शतकी भागीदारी रचली.

70-2 (16 Ov) : माक्ररम - हेंड्रिक्सने आफ्रिकेचा डाव सावरला

शाहबाज अहमदने 25 धावा करणाऱ्या मलानला बाद केल्यानंतर रीझा हेंड्रिक्स आणि एडेन माक्ररमने आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

RSA 137/2 (26.2)  हेंड्रिक्सचे अर्धशतक

भारताविरूद्ध पदार्पण करणाऱ्या रीझा हेंड्रिक्सने दमदार अर्धशतक ठोकत माक्ररमसोबत तिसऱ्या विकेटसाठी जवळपास शतकी भागीदारी रचली.

19-1 (5 Ov) : आफ्रिकेची सावध सुरूवात

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या 5 षटकात एक विकेट गमावल्यानंतर सावध फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्यांना 5 षटकात 19 धावांवपर्यंतच मजल मारता आली.

7-1 : मोहम्मद सिराजने मिळवून दिलं पहिलं यश

मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेचा अव्वल सलामीवीर क्विंटन डिकॉकचा 5 धावांवर त्रिफळा उडवून देत भारताला पहिले यश मिळवून दिले.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका आणि भारताने आपल्या संघात प्रत्येकी दोन बदल केले आहेत. कर्णधार टेम्बा बाऊमा आणि शामसी आजचा सामना खेळणार नसून त्याच्या जागी रीझा हेंड्रिक्स आणि बजॉर्नला संधी मिळाली आहे.

तर भारतीय संघात ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई यांच्याजागी वॉशिंग्टन सुंदर आणि पादार्पण करणाऱ्या शाहबाज अहमद यांचा समावेश केला आहे.

रांचीत रंगणार दुसरा वनडे सामना 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना रांची येथे होत आहे. मालिका वाचवण्यासाठी भारतासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे.