India vs South Africa 2nd ODI Preview
esakal
ड्रेसिंग रूममधील वातावरणाची जोरदार चर्चा सुरू असली तरी भारतीय संघाची मदार पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहली (रो-को) यांच्या सातत्यपूर्ण फॉर्मवर अवलंबून आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज दुसरा सामना होत असून, हा सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवण्याचे लक्ष्य भारतीय संघाने ठेवले आहे. रांची येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने आपले ५२वे एकदिवसीय शतक झळकावले, तर रोहित शर्माने ५७ धावांची वेगवान खेळी करून आपला फॉर्म सिद्ध केला.