India vs South Africa 3rd ODI
esakal
कसोटी मालिका गमावण्याची आपत्ती कोसळल्यानंतर भारतीय क्रिकेट संघावर एकदिवसीय मालिका गमावण्याचे संकट उभे राहिले आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये १-१ अशी बरोबरी झाली असून, आता आज दोन देशांमधील अखेरचा सामना विशाखापट्टण येथे रंगणार आहे. याप्रसंगी एकदिवसीय मालिका वाचवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. अखेरच्या लढतीत विजय मिळवल्यास भारतीय संघाला मालिका विजयावर शिक्कामोर्तब करता येईल. रोहित शर्मा व विराट कोहली या अनुभवी खेळाडूंचा दमदार फॉर्म यजमान टीम इंडियासाठी मोलाचा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकन संघ पहिल्यांदाच भारतामध्ये एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.