IND vs SA : चहल - पटेलचा भेदक मारा; भारताचा विजय

India vs South Africa 3rd T20I Live Cricket Score Highlights
India vs South Africa 3rd T20I Live Cricket Score Highlightsesakal

विशाखापट्टणम : सलग दोन पराभव झालेल्या भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव करत विजयाचे खाते उघडले. याचबरोबर आफ्रिकेचा मालिकेवर कब्जा करण्याचा मनसुबा देखील हाणून पाडला. भारताचे 180 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेला 131 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून हर्षल पटेल 4 तर युझवेंद्र चहलने 3 विकेट घेतल्या. फलंदाजीत सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 57 तर इशान किशनने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली.

युझवेंद्रने आफ्रिकेला दिला मोठा धक्का

युझवेंद्र चहलने 29 धावा करणाऱ्या क्लासनला बाद करत आफ्रिकेला सहावा आणि मोठा धक्का दिला.

71-5 : डेव्हिड मिलरचा अडसर दूर

हर्षल पटेलने फॉर्ममध्ये असलेल्या डेव्हिड मिलरला 3 धावांवर बाद करत आफ्रिकेला पाचवा धक्का दिला.

57-4 : चहलचा जलवा

भारताचे 180 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला हर्षल पटेल, अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहलने धक्के दिले. पहिल्या 10 षटकात आफ्रिकेची अवस्था 4 बाद 60 धावा अशी झाली. चहलने दोन विकेट घेतल्या.

हार्दिक पांड्याची फटकेबाजी 

हार्दिक पांड्याने शेवटच्या दोन षटकात फटकेबाजी करत 21 चेंडूत 31 धावा केल्या. यामुळे भारताने 20 षटकात 5 बाद 179 धावांपर्यंत मजल मारली.

158-5 : भारताला पाठोपाठ दोन धक्के

प्रेटोरियसने पंतला आणि कसिगो रबाडाने दिनेश कार्तिकला बाद करत भारताला दोन धक्के दिले.

131-3 : प्रेटोरिसने इशान किशनची इनिंग संपवली

प्रेटोरियसने 35 चेंडूत 54 धावा करणाऱ्या इशान किशनला बाद करत भारताला तिसरा धक्का दिला.

128-2 : भारताला दुसरा धक्का

तबरेज शमसीने श्रेयस अय्यरला 14 धावांंवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.

इशान किशनची आक्रमक फलंदाजी

ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर इशान किशनने आक्रमक फलंदाजी करत 31 चेंडूत अर्धशतक झळकावले. याचबरोबर भारताने 11 व्या षटकात शतकी मजल मारली.

97-1 : ऋतुराज अर्धशतकानंतर लगेच बाद

आक्रमक फलंदाजी करत अर्धशतकी खेळी करणारा ऋतुराज गायकवाड 35 चेंडूत 57 धावा करून केशव महाराजच्या गोलंदाजीवर त्याच्याकडे झेल देत बाद झाला.

95-0 (9.3 Ov) :  ऋतुराज गायकवाडचे दमदार अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या दोन सामन्यात शांत असणारी ऋतुराज गायकवाडची बॅट अखेर तिसऱ्या आणि महत्वाच्या सामन्यात तळपली. त्याने अर्धशतकी खेळी करत संघाला 10 व्या षटकात 95 धावांपर्यंत मजल मारून दिली.

सलामी जोडीचे अर्धशतक 

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने दमदार सुरूवात केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी सहाव्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. यात आक्रमक फलंदाजी करणाऱ्या ऋतुराजने मोठा वाटा उचलला

पंतने नाणेफेक गमावली

तिसऱ्या आणि मालिका वाचवण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या टी 20 सामन्यात भारताचा कर्णधार ऋषभ पंतने पुन्हा एकदा नाणेफेक गमावली आहे. टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतचे सर्वस्व लागले पणाला 

भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या ऋषभ पंतचे आजच्या तिसऱ्या सामन्यात सर्वस्व पणाला लागले आहे. आजचा सामना जर भारताने गमावला तर दक्षिण आफ्रिकेविरूद्धची टी 20 मालिका देखील गमवावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com