india vs south africa 3rd t20i | भारतीय संघावर आता मालिका गमावण्याचे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india vs south africa 3rd t20i

Ind Vs Sa : भारतीय संघावर आता मालिका गमावण्याचे संकट

India vs South Africa 3rd T-20I : सुमार कामगिरीमुळे पराभव ओढवून घेणाऱ्या भारतीय संघासमोर आता मायदेशात मालिका गमावण्याचे संकट समोर उभे राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील आज होणारा तिसरा सामना आयपीएल गाजवणाऱ्या भारतीयांची प्रतिष्ठा पणास लावणारा आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या मायदेशात ०-३ अशी हार होऊन मालिका गमावणाऱ्या भारतीय संघात आता रोहित, विराट, बुमरा, जडेजा असे दिग्गज खेळाडू खेळत नसले तरी आयपीएलमध्ये प्रभाव पाडलले खेळाडू संघात आहेत, पण ऋतुराज गायकवाड, रिषभ पंतपासून युझवेंद्र चहल, सर्वच अपयशी ठरत आहेत.(india vs south africa 3rd t20i probable xi of team india ind vs sa)

हेही वाचा: मनमाडची आकांक्षा ठरली रौप्यपदकाची मानकरी

आज होणारा सामना जिंकला नाही तर भारताच्या दुसऱ्या फळीच्या संघातील खेळाडूंच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ शकते आणि याची सुरुवात कर्णधारपदाची जबाबदारी असलेल्या पंतपासून सुरू होईल. मुळात आयपीएलमध्ये त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. त्यातच कर्णधार म्हणून केलेल्या चुकांचा फटका दिल्ली संघाला बसला होता. रोहित शर्मा आणि त्यानंतर केएल राहुल अनुपलब्ध असल्यामुळे पंतला टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती, परंतु तो स्वतःच्या फलंदाजीला आणि नेतृत्वाला न्याय देऊ शकलेला नाही.

हेही वाचा: IPL Media Rights : स्टार स्पोर्ट्सकडेच IPL प्रक्षेपण हक्क

पंत नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

रविवारच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने पहिल्या दोन षटकांत विकेट मिळवल्यानंतर सलग तिसरे षटक गोलंदाजी देण्याऐवजी पंतने त्याला एक षटक विश्रांती दिल्यानंतर तिसरे षटक दिले होते. त्यानंतर क्लासेन हुकुमत गाजवत असताना भुवनेश्वरचा पंतला विसर पडला. अखेर आफ्रिकेला विजयासाठी दोन धावांची गरज असताना भुवनेश्वरला चौथे षटक दिले. पंतच्या अशा अस्थिर नेतृत्वावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात भारतीयांना सर्वच क्षेत्रांत कामगिरी उंचावावी लागणार आहे. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाज आयपीएलमध्ये केलेल्या प्रदर्शनाच्या अर्धाही खेळ करू शकलेले नाहीत. गोलंदाजी तर पूर्णतः निष्प्रभ झाली आहे.

संघात बदल होणार?

पहिला सामना गमावल्यानंतरही त्याच खेळाडूंना दुसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली होती; आता मालिका गमावण्याची भीती असल्यामुळे गोलंदाजीत बदल अपेक्षित आहे. आवेश खानऐवजी अर्षदीप सिंगला प्राधान्य मिळू शकते; तर हर्षल पटेलऐवजी उमरान अकमलचा पर्याय असेल. अक्षर पटेलऐवजी बिश्नोईचाही विचार होऊ शकतो.

Web Title: India Vs South Africa 3rd T20i Probable Xi Of Team India Ind Vs Sa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top