Ind vs SA 4th T20 Playing XI
esakal
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज चौथा टी-२० सामना लखनौ येथे रंगणार आहे. टीम इंडियाचा संघ या लढतीत विजय मिळवून मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ लखनौ लढतीत भारतावर मात करीत टी-२० मालिकेत २-२ अशी बरोबरीसाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे तो म्हणजे सूर्यकुमार यादवचा फलंदाजी फॉर्म. मागील २१ डावांमध्ये त्याला अर्धशतक झळकावता आलेले नाही.