
भारताचा अती आत्मविश्वासाने केला घात : ताहिर
मस्कत : दक्षिण आफ्रिकेने सलग दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका २ - ० अशी जिंकला. (India vs South Africa) भारताने कसोटी मालिकेत आघाडी घेऊन मालिका गमावली होती. आता सलग दोन सामन्यात दोन पराभव झाल्याने संघावर सर्व स्तरातून टीका होत आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इम्रान ताहिरने (Imran Tahir) भारतीय संघावर टीका केली आहे. त्याच्या मते भारतीय संघाला अती आत्मविश्वास नडला आहे. (India vs South Africa India defeat because of over confidence)
हेही वाचा: IPL Mega Auction पूर्वीच अहमदाबाद आणि लखनौने किती केला खर्च?
इम्रान ताहिर सध्या लेजंड क्रिकेट लीगमध्ये (Legend Cricket League) वर्ल्ड जायंट संघाकडून खेळत आहे. तो म्हणाला की, 'मी कोणत्याही संघाला जज करत नाहीये. पण, भारतीय संघ एक चांगला संघ आहे आणि दक्षिण आफ्रिका एक परिपक्व होत असलेला संघ आहे. भारताला दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाचा अंदाज आला नाही. त्यांना या संघाला आपण आरामात हरवू असा अती आत्मविश्वास होता. या मुळेच भारताचा पराभव झाला.'
हेही वाचा: कारणे दाखवा नोटीसवर सौरभ गांगुलीचा खुलासा
इम्रान ताहिर पुढे म्हणाला, 'भारताने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात गेल्या ४ ते ५ वर्षात तगडी कामगिरी केली आहे. पण, या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने दमदार कामगिरी केली. त्यांनी आपल्या मायदेशातील परिस्थितीचा चांगला फायदा उचलला.' इम्रान ताहिर आपल्या संघाबद्दल पुढे म्हणतो, 'हा सर्वात मोठा विजय आहे. या संघासाठी विशेष आहे. हा संघ खूपच तरूण आहे. त्यांनी अशा संघाला हरवले आहे ज्याचा दोन्ही फॉरमॅटमध्ये दबदबा आहे. दक्षिण आफ्रिकेने चांगला खेळ केला. त्यांनी दोन्ही मालिका जिंकल्या.'
Web Title: India Vs South Africa India Defeat Because Of Over Confidence
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..