IPL Mega Auction पूर्वीच अहमदाबाद आणि लखनौने किती केला खर्च?

Lucknow and Ahmedabad IPL Mega Auction Hardik Pandya KL Rahul
Lucknow and Ahmedabad IPL Mega Auction Hardik Pandya KL Rahul esakal

नवी दिल्ली : आयपीएल २०२२ हंगामात आठ नाही तर दहा संघ खेळणार आहेत. या हंगामात अहमदाबाद आणि लखनौ (Lucknow and Ahmedabad) या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात येणार आहे. या दोन संघांना इतर आठ संघांप्रमाणेच बीसीसीआयने (BCCI) मेगा ऑक्शनपूर्वी (IPL Mega Auction) प्रत्येकी चार खेळाडू खरेदी करण्याची मुभा दिली होती. या दोन संघांनी प्रत्येकी ३ खेळाडू ऑक्शन आधीच खरेदी केले आहेत. (how Much Spend money by Lucknow and Ahmedabad Before IPL Mega Auction)

Lucknow and Ahmedabad IPL Mega Auction Hardik Pandya KL Rahul
कारणे दाखवा नोटीसवर सौरभ गांगुलीचा खुलासा

लखनौ संघाने केएल राहुल (KL Rahul) , मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या तीन खेळाडूंना खरेदी केले आहे. तर अहमदाबादने लोकल बॉय हार्दिक पांड्या (Hardik Pandya), राशीद खान (Rashid Khan) आणि शुभमन गिलला (Subhman Gill) आपल्या कळपात सामिल करून घेतले. लखनौने केएल राहुलच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाचा भार टाकला असून अहमदाबादने कर्णधारपदाची माळ हार्दिक पांड्याच्या गळ्यात टाकली.

Lucknow and Ahmedabad IPL Mega Auction Hardik Pandya KL Rahul
अजून तीन भोपळे मग 'भोपळ्यांची' गादी सचिनकडून विराटकडे येणार

अहमदाबादने तीन खेळाडूंसाठी खर्च केलेली रक्कम

हार्दिक पांड्या - १५ कोटी

राशीद खान - १५ कोटी

शुभमन गिल - ८ कोटी

एकूण - ३८ कोटी

लखनौने तीन खेळाडूंसाठी खर्च केलेली रक्कम

केएल राहुल - १७ कोटी

मार्कस स्टॉयनिस - ९.२ कोटी

रवी बिश्नोई - ४ कोटी

एकूण - ३०.२ कोटी

Lucknow and Ahmedabad IPL Mega Auction Hardik Pandya KL Rahul
#RSAvsIND: 'समालोचकांना विनंती डेथ ओव्हर म्हणू नका'

फेब्रुवारी महिन्यात १२ आणि १३ तारखेला बंगळुरूमध्ये आयपीएलचे मेगा ऑक्शन होणार होते. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. तो आजच्या बीसीसीआयच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. अनेक आयपीएल संघांचे मालक हे मुंबईमध्ये राहतात. त्यांना प्रवास करण्याची इच्छा नाही त्यामुळे ते मेगा ऑक्शन (IPL Mega Auction) मुंबईत घेण्याची मागणी करू शकतात. मात्र याच्यावर अजून कोणता निर्णय झालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com