VIDEO : शनाकाची सलग दुसऱ्या सामन्यात तुफान फटकेबाजी; पण...

Dasun Shanaka
Dasun ShanakaSakal

India vs Sri Lanka, 3rd T20I : धर्मशालाच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यातही श्रीलंकेची बिकट अवस्था झाली. मालिका आधीच गमावलेल्या श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. श्रीलंकेचा (Sri Lanka) संघ शंभरीही पार करणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. अवघ्या 29 धावांत त्यांनी आघाडीचे चार फंलदाज गमावले. पण कर्णधार दसुन शनाका (Dasun Shanaka) याने पुन्हा एकदा संघाची लाज राखली. त्याने स्फोटक फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. पण श्रीलंकेला भारतीय संघासमोर फार आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही.

भारतीय संघ 4 बदलासह मैदानात उतरला होता. आवेश खान, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवि बिश्नोई यांनी दिलेल्या संधीच सोन करुन दाखवलं. आवेश खान आणि मोहम्मद सिराजने पावरप्लेमध्ये केवळ 18 धावा खर्च करुन पहिल्या तीन विकेट घेतल्या. रवि बिश्नोईच्या हाती चेंडू देताच त्याने जनिथ लियांगेला बोल्ड करत संघाला चौथे यश मिळवून दिले.

Dasun Shanaka
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक; वांद्रे पोलिसांकडून कारवाई

श्रीलंकाच्या धावफलकावर 4 बाद 29 धावा असताना कर्णधार दशुन शनाकाने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने पाचव्या विकेटसाठी चंडीमलच्या साथीनं 32 आणि सहाव्या विकेटसाठी करुणारत्ने (12) सोबत नाबाद 86 धावांची भागीदारी रचत कोलमडलेला डाव सावरला.

Dasun Shanaka
VIDEO : तो हुक करायला गेला अन् सिराजनं विकेट बूक केली

पहिल्या 15 षटकात श्रीलंकेच्या धावफलकावर अवघ्या 78 धावा होत्या. शनाकाने दमदार फटकेबाजी करत अखेरच्या पाच षटकात 68 धावा कुटल्या. त्याने 38 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 74 धावांची खेळी केली. भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही त्याने धमाकेदार खेळी केली होती. 19 चेंडूत त्याने 47 धावा कुटल्या. पण भारतीय संघाने हा सामना जिंकून त्याची खेळी व्यर्थ ठरवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com