esakal | SL vs IND : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंकेचा इंग्लंड पॅटर्न?
sakal

बोलून बातमी शोधा

IND VS SL

SL vs IND : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंकेचा इंग्लंड पॅटर्न?

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील वनडे आणि टी-20 मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या ताफ्यातील दोघांना कोरोनाची लागण झालीये. त्यामुळे मालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डासाठी ही मालिका खूप महत्त्वपूर्ण अशी आहे. भारताविरुद्धच्या मालिकेतून श्रीलंकेला प्रत्येक मॅचला 15 कोटीप्रमाणे जवळपास 90 कोटींची कमाई होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही मालिका सुरळीत पार पाडण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्ड प्रयत्नशील असेल. (SL vs IND Sri Lanka Bord May Be Take D ecisionLike England Cricket Board)

स्थानिक प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, इंग्लंड दौऱ्यावरुन परतलेल्या ताफ्यातील दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या दौऱ्यावरील खेळाडूंना भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यांपासून दूर ठेवण्याचा विचार बोर्डाकडून सुरु आहे. यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. इंग्लंडच्या संघाने पाकिस्तान विरुद्ध दुसरा संघ मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. अगदी त्याच पॅटर्नची कॉपी करुन श्रीलंका क्रिकेट बोर्ड मोठे नुकसान टाळू शकते.

श्रीलंका संघाचे फलंदाजी कोच ग्रँड फ्लावर आणि डाटा विश्लेषक जीटी निरोशन (GT Niroshan) या दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व खेळाडूंची पहिली आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तरीही या खेळाडूंशिवाय वेगळी संघ बांधणी करता येईल का? याचा बोर्डाकडून विचार केला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जोखीम टाळण्यासाठी त्यांच्याकडे हाच पर्याय असेल.

हेही वाचा: ENG v PAK :स्टोक्सनं मोडला धोनीचा खास रेकॉर्ड

काय आहे इंग्लंड पॅटर्न

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतच इंग्लंड संघातील 7 सदस्यांचे कोरोना रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आली होती. या खळबळजनक घटनेनंतर इंग्लंड आणि वेल्स बोर्डाने संपर्कातील सर्व खेळाडूंना क्वारंटाईन केले. घरच्या मैदानावरील पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा नवा संघ मैदानात उतरवण्याचा निर्णय इंग्लंड आणि वेल्स बोर्डाने घेतला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघात अनेक नवे चहरे आहेत. कोरोनाच्या संकटामुळे मालिकेत खंड न पडू देता इंग्लंडने निवडलेला पर्याय क्रिकेटच्या मैदानात पुन्हा दिसू शकतो.

हेही वाचा: "BCCI ने धोनीची जर्सी नंबर 7 रिटायर करावी"

....तर पहिल्यांदाच दिसेल अनोखा योगायोग

सध्याच्या घडीला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर पाठवला आहे. जर कोरोनाच्या दहशतीमुळे श्रीलंकेनेही एक वेगळा संघ निवडला तर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन पर्यायी संघ एकमेकांसोबत लढताना दिसू शकतील.

loading image