esakal | India vs Sri Lanka: इशान किशनने उलगडलं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकण्याचं रहस्य
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Sri Lanka: इशान किशनने उलगडलं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकण्याचं रहस्य

India vs Sri Lanka: इशान किशनने उलगडलं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकण्याचं रहस्य

sakal_logo
By
दीनानाथ परब

कोलंबो: पहिल्याच सामन्यात (first match) सात विकेटने विजय मिळवून भारताने श्रीलंकेविरुद्धच्या (one day series) एकदिवसीय मालिकेची (India vs Sri Lanka) दमदार सुरुवात केली आहे. काल सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते, यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने. (ishan kishan) पहिल्याच सामन्यात ४२ चेंडूत ५९ अर्धशतकी खेळी करणाऱ्या इशानने आठ चौकार आणि दोन षटकारांसह चौफेरे फटकेबाजी केली. इशानने काल एक वेगळा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. (India vs Sri Lanka Ishan Kishan reveals secret behind 1st-ball six in debut ODI)

आक्रमक फलंदाज म्हणून ओळख असलेल्या इशानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर थेट षटकार ठोकला. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात किशन तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी आला होता. सलामीवीर पृथ्वी शॉ ने जी दमदार सुरुवात करुन दिली होती. ती लय कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न होता.

हेही वाचा: मुंबईत सध्या ALL Ok, जाणून घ्या लोकलच्या updates

सहाव्या षटकात किशन मैदानावर फलंदाजीसाठी उतरला व त्याने धनंजय डि सिल्वाच्या पहिल्याच चेंडूवर लाँग ऑनला षटकार ठोकला. इशान किशनने काल त्याचा २३ वा वाढदिवस अर्धशतक झळकवून वाढदिवस साजरा केला. धवन ८६ धावांवर नाबाद राहिला. भारताने १३.२ षटके राखून श्रीलंकेचे २६३ धावांचे आवाहन पार केले.

हेही वाचा: 'सामना'मध्ये हेडलाईन येईल "आमचीच लाल आमचीच लाल"; मनसेचा टोला

भारताच्या विजयानंतर इशान किशनने यझुवेंद्र चहलच्या 'चहल टीव्ही' वर प्रतिक्रिया दिली. "बॉलचा टप्पा कुठेही पडूं दे. मी सिक्सरच मारणार होतो. कारण खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करत नव्हती" असे किशनने सांगितले. "माझे स्वप्न प्रत्यक्षात आले आणि यापेक्षा चांगली भावना असू शकत नाही. भारताची जर्सी घालणं हा सन्मान आहे. तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. मेहनत, कष्ट घेण्याचे माझे लक्ष्य कायम आहे" असे इशान किशनने इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

loading image