INDvsSL:मुंबईकर शार्दुल पुन्हा चमकला; सैनीनं लक्ष वेधलं!

टीम ई-सकाळ
मंगळवार, 7 जानेवारी 2020

मुंबईच्या शार्दुल ठाकूरनं आज, श्रीलंकेविरुद्धही चमकदार कामगिरी केली. त्यानं तीन बळी घेत श्रीलंकेला 150 धावांच्या आत रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली.

इंदौर : वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करून कॅप्टन विराट कोहलीची शाबासकी मिळवणाऱ्या मुंबईच्या शार्दुल ठाकूरनं आज, श्रीलंकेविरुद्धही चमकदार कामगिरी केली. त्यानं तीन बळी घेत श्रीलंकेला 150 धावांच्या आत रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्याला नवख्या सैनीनं चांगली साथ दिली. त्यानं केवळ 18 धावा देत श्रीलंकेचे दोन फलंदाज माघारी पाठवले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुवाहटीचा पहिला सामान पावसात वाया गेल्यानं आज, इंदौरमधल्या सामन्याकडं भारतीय क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. त्यातच आज इंदौरमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं चिंता वाढली होती. पण, सामना वेळेत सुरू झाला आणि चाहत्यांना जीव भांड्यात पाडला. पहिल्या सामन्या प्रमाणं विराटनं इथंही टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. वॉशिंग्टन सुंदरनं कॅप्टन कोहलीचा विश्वास सार्थ ठरवत श्रीलंकेची सलामीची जोडी फोडली. त्यानं सलामीवीर फेर्नांडोला माघारी धाडलं. त्यानंतर कुलदीपनं दोन आणि सैनीनं दोन बळी घेऊन श्रीलंकेचं कंबरडं मोडलं. पुढच्या तीन फलंदाजांना घरचा रस्ता दाखवत शार्दुलनं टीम इंडियाचं काम सोपं केलं.

आणखी वाचा - हर्षवर्धन सदगीर बनला महाराष्ट्र केसरी

गोलंदाजांच्या या चमकदार कामगिरीमुळं टीम इंडियानं श्रीलंकेला 142 धावांवर रोखलंय. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळं श्रीलंकेला दीडशतकी मजलही मारता आली नाही. त्यांच्या तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या परेरानं सर्वाधिक 34 धावा केल्या. शार्दुल ठाकूरनं 23 धावा देऊन तीन बळी घेतले तर, कुलदीप यादवनं 38 धावा देत दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. वॉशिंग्टन सुंदर (1), सैनी (2) आणि बुमराह (1) यांनी शार्दुलला चांगली साथ दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india vs sri lanka t20 indore shardul thakur gets three wickets