SL vs IND : गब्बर टॉपर; ऋतूराज-पदिक्कलची छोटीखानी खेळी

ऋतूराज आणि पदिक्कल दोघांनी सुरुवात चांगली केली पण...
Shikhar Dhawan
Shikhar DhawanEranga Jayawardena

India Vs Sri Lanka T20 : श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शिखर धवनने टॉस गमावला. पहिल्यांदा बॅटिंगची वेळ आल्यानंतर अनुभवी सलामीवीर शिखर धवनने पदार्पणातील सामना खेळणाऱ्या ऋतूराज गायकवाडच्या साथीने भारताच्या डावाला सुरुवात केली. या जोडीनं संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पण संघ अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना ऋतूराज गायकवाड शनाकाच्या जाळ्यात अडकला. त्याने 18 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 21 धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या देवदत्त पदिक्कलचाही आंतरराष्ट्रीय टी-20 तील पहिलाच सामना होता.

धवनने त्याच्या साथीनं डाव पुढे सरकवला. पदिक्कलच्या भात्यातून काही अप्रतिम फटके पाहायला मिळाले. उत्तम सुरुवात केल्यानंतर तोही पदार्पणाच्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने 23 चेंडूत 29 धावा केल्या. संजू सॅमसन अवघ्या 7 धावांची भर घालून स्वस्तात माघारी फिरला.

Shikhar Dhawan
'द हंड्रेड'मध्ये स्मृतीचा धमाका; तिचा सिक्सर पाहाच (VIDEO)

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताकडून चार जणांनी पदार्पण केले. त्यातील नितीश राणालाही नावाला साजेशी खेळी करुन पदार्पणात धमाकेदार तेवर दाखवण्यात अपयश आले. भारताकडून कर्णधार धवनने सर्वाधिक 40 धावा केल्या. धनंजयाने त्याचा अडथळा दूर करत संघाला यश मिळवून दिले. उप-कर्णधार भुवनेश्वर कुमार 13* आणि नवदीप सैनी 1* धाव करत संघाची धावसंख्या निर्धारित 20 षटकात 5 बाद 132 धावांपर्यंत पोहचवली.

Shikhar Dhawan
Olympics : महिला खेळाडूसोबत कोचनं असं का केलं? व्हिडिओ व्हायरल

क्रुणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंशिवाय भारतीय संघाला प्लेइंग इलेव्हनची निवड करावी लागली. पाच फलंदाज आणि सहा गोलंदाज बॅटिंग लाईनअप या सामन्यात पाहायला मिळाली. पाचही फलंदाज बाद झाले. ऋतूराज आणि पदिक्कल दोघांनी सुरुवात चांगली केली पण छोटीखानी धावसंख्या त्यांना मोठ्या खेळीत बदलता आली नाही. धवन 40 धावांपर्यंत पोहचला. प्लेइंग इलेव्हनमधील प्रमुख पाच फलंदाजांपैकी एकालाही अर्धशतकी खेळी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाची इनिंग ही अर्धशतकाशिवायच संपल्याचे पाहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com