Shubman Gill to Lead India in Ahmedabad :
esakal
टी-२० प्रकारातील आशिया करंडक स्पर्धेवर वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेवरही प्रभूत्व गाजवण्यास सज्ज झाला आहे. दोन कसोटी सामन्यांची ही मालिका आजपासून होत आहे. प्रशिक्षक गौतम गंभीरसह कर्णधार शुभमन गिल आणि काही खेळाडू दुबईहून सोमवारीच अहमदाबादमध्ये दाखल झाले आणि क्षणाचाही विलंब अथवा विश्रांती न घेता लगेचच कसोटी क्रिकेटच्या मोडमध्ये बदल केला आहे.