IND vs WI : कोहलीचा लाडला होणार रोहितचा जोडीदार? |Team India Playing 11 Predication | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma

IND vs WI : कोहलीचा लाडला होणार रोहितचा जोडीदार?

India vs West Indies : घरच्या मैदानावर सुरु असलेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पण तरीही दुसऱ्या वनडेसाठी कर्णधार रोहित शर्मासमोर (Rohit Sharma) मोठा पेच निर्माण झाला आहे. पहिल्या वनडेला मुकलेला लोकेश राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) दुसऱ्या सामन्यासाठी फिट असून भारतीय संघाच्या डावाची सुरुवात कुणासाबोत करायची याच उत्तर रोहितला शोधावं लागणार आहे.

राहुल की मयांक?

पहिल्या वनडेत रोहितनं ईशान किशनच्या साथीनं डावाला सुरुवात केली होती. दोघांनी संघाला चांगली सुरुवातही करुन दिली. पण आता दोन दिग्गज सलामीवीर परतल्यानंतर युवा ईशान किशनची जागा बदलणार की त्याला बाकावर बसावे लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अनुभवी शिखर धवन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तो या मालिकाला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत नेहमी रोहित आणि लोकेश राहुलनं टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच दुसऱ्या सामन्यात रोहितसोबत विराट कोहलीचा लाडला समजाला जाणारा लोकेश राहुल भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा: पाक दौऱ्यातून माघारीच्या सावटाखालीच ऑस्ट्रेलिया संघाची झाली घोषणा

भविष्याच्या दृष्टीने विचार केल्या लोकेश राहुलला मध्यफळीत खेळवण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. ज्यावेळी शिखर धवन कमबॅक करेल त्यावेळी रोहित आणि धवन ही राइट लेफ्ट कॉम्बिनेशन जवळपास पक्की असेल.

हेही वाचा: Propose Day 2022 : 'नारायण..नारायण...' KKR नं केली फिरकीपटूची गंमत

कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात प्रत्येकाला संधी दिली जाईल, असे कर्णधार रोहित आधीच म्हणला आहे. पहिल्या सामन्यात दीपक हुड्डाला पदार्पणाची संधी मिळाली. त्याने संधीच सोन करुन दाखवलं. दुसऱ्या वनडेत टीम इंडियात एकमेव बदल होऊ शकतो. लोकेश राहुलसाठी ईशान किशनचा पत्ता कट होऊ शकतो.

Web Title: India Vs West Indies 2nd Odi Match Team India Playing 11 May Be Rohit Sharma Open With Kl Rahul

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top