
IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहेत. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने कॅरेबियन संघाचा डाव अवघ्या 176 धावांत आटोपला. वेस्ट इंडीजकडून जेसन होल्डरच्या 57 धावा वगळता अन्य एकालाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही.
भारताकडून युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) सर्वाधिक चार विकेट घेतल्या. वाशिंग्टन सुंदरला तीन विकेट मिळाल्या. तर प्रसिद्ध कृष्णानं दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने सलामीवीर शाई होपला 8 धावांवर माघारी धाडले. आउट होण्यापूर्वी शाई होपनं सिराजला दोन खणखणीत चौकार मारले होते. होपला बाद करत त्याने बदलाच घेतला. त्यानंतर त्याने हवेत उंच उडी मारत सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दोन चौकार खाल्यानंतर सिराजने अप्रतिम इनस्विंग चेंडू फेकला. पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या नादात होप फसला आणि बॅटची कड घेऊन चेंडू यष्टीवर जाऊन आदळला. सिराजने रोनाल्डो स्टाईल सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय संघ ऐतिहासिक 1000 वी कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात युजवेंद्र चहलने शंभरी विकेट्सचा टप्पा पार केला. वनडेत शंभर विकेट्सचा पल्ला गाठणारा चहल भारताचा 26 वा गोलंदाज आहे. जलदगतीने हा पल्ला पार करण्यात चहल पाचव्या क्रमांकावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.