IND vs ZIM 3rd ODI : झिम्बाब्वेला क्लीन स्वीप करण्यावर भारताचे लक्ष, सामना कुठे पहायचा ते जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ZIM 3rd ODI

IND vs ZIM 3rd ODI : झिम्बाब्वेला क्लीन स्वीप करण्यावर भारताचे लक्ष, सामना कुठे पहायचा ते जाणून घ्या

IND vs ZIM 3rd ODI : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज हरारे येथे होणार आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाची नजर झिम्बाब्वेविरुद्ध क्लीन स्वीपवर आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने झिम्बाब्वेचा प्रत्येक क्षेत्रात पराभव केला. यजमान संघ आता भारतासमोर पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे.

हेही वाचा: Ind Vs Pak Asia Cup 2022: 'बुमराह नसेल तर...' इरफान पठाणने वकार युनूसला दिले चोख प्रत्युत्तर

पुढील वर्षी होणारा एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून भारत प्रयोग करत आहे. राहुलने दोन्ही सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना भरपूर संधी दिली. आता तो बेंचवर बसलेल्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये आणतो की नाही हे पाहावे लागेल. शिखर धवन, शुभमन गिल, दीपक हूडा व संजू सॅमसन यांनी चमक दाखवली आहे. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव यांनी चोख कामगिरी केली आहे.

हेही वाचा: Ind vs Zim ODI : महाराष्ट्राचे खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत; असा असेल इंडियाचा प्लेइंग-11

भारत विरुद्ध झिम्बाब्वे तिसरा वनडे

  • तिसरा एकदिवसीय - 22 ऑगस्ट, हरारे, 12:45 PM

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 12:15 वाजता होईल.

तुम्ही तिसरा एकदिवसीय सामना कुठे पाहू शकता

  • भारतातील सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर चाहत्यांना भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा वनडेचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

भारत : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रणंद कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद

Web Title: India Vs Zimbabwe 1st Odi Match When And Where To Watch Ind Vs Zim Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..