esakal | पन्नास वर्षांची प्रतिक्षा अन् टीम इंडियाला मिळालं यश!
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

पन्नास वर्षांची प्रतिक्षा अन् टीम इंडियाला मिळालं यश!

sakal_logo
By
सुशांत जाधव

England vs India Oval, London Record : ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दिमाखदार विजय नोंदवला. पिछाडीवरुन सामन्यावर पकड मिळवून तो जिंकून दाखवण्याची किमया पुन्हा एकदा संघाने दाखवून दिली. टीम इंडियाची ही सवय गेल्या काही वर्षांपासूनची नाही. यापूर्वीही टीम इंडियाने बॅकफूटवर जाऊन चौकार खेचण्याची शैली दाखवून दिली आहे. क्रिकेटच्या इतिहासात आपल्याला याचे उत्तर मिळते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ओव्हलमध्ये नोंदवलेला विजय खास असाच आहे. याच कारण म्हणजे हे मैदानात इंग्लंडचा बालेकिल्ला असल्याप्रमाणे आहे. या मैदानातील विजयासाठी टीम इंडियाला 8 सामने आणि 50 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली आहे.

क्रिकेटच्या इतिहासाची पाने उलटली तर भारत आणि इंग्लंड यांच्यात या मैदानात आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. 15 ते 18 ऑगस्ट 1936 मध्ये जो पहिला कसोटी सामना झाला त्यात टीम इंडियाला 9 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला. 10 वर्षानंतर म्हणजे 17 ते 20 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या कसोटीत टीम इंडियाने मॅच ड्रॉ करुन दाखवली. 1952 मध्ये टीम इंडियाने हीच पुनरावृत्ती केली. पण 1959 मध्ये टीम इंडियाला ओव्हलच्या मैदानात 27 धावा आणि डावाने पराभव स्विकारावा लागला होता.

हेही वाचा: IND vs ENG : टीम इंडियाच्या विजयामागची पाच कारणं...

1971 मध्ये या मैदानात टीम इंडियाची विजयाची प्रतिक्षा संपली. दिवंगत क्रिकेटर अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ओव्हलच्या मैदानात पहिला विजय नोंदवला. या सामन्यात इंग्लंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना पहिल्या डावात 355 धावा केल्या. टीम इंडियाचा पहिला डाव 284 धावांवर आटोपला. इंग्लंडकडे 71 धावांची आघाडी होती. फिरकीपटू चंद्रशेखर यांच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात अक्षरश: नांगी टाकली. त्यांचा दुसरा डाव अवघ्या 101 धावांत आटोपला. 172 धावांचे आव्हान पार करत टीम इंडियाने पिछाडीवरुन सामना जिंकून दाखवला होता. त्यामुळे पिछाडीवरुन विजयी भरारी घेण्याचा थाट पूर्वीपासूनच संघात आहे, असेच म्हणावे लागेल.

हेही वाचा: IND vs ENG : इंग्लंडला लगाम; टीम इंडियानं वसूल केला 'लगान'

ओव्हलच्या मैदानातील रेकॉर्ड

चौथ्या कसोटी सामन्यासह भारत आणि इंग्लंड यांच्यात या मैदानात 14 कसोटी सामने खेळवण्यात आले. यातील 7 सामने हे अनिर्णित राहिले असून 5 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तर 2 सामन्यात भारतीय संघाने विजयाची स्क्रीप्ट लिहिली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पहिला विजय संघाला मिळालेला विजय हा या मैदानातील मिळवलेला विजय

loading image
go to top