भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार एलवेरा ब्रिटो यांचे निधन | Elvera Britto passes away | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india women hockey captain Elvera Britto passes away

भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार एलवेरा ब्रिटो यांचे निधन

भारताची माजी महिला हॉकी कर्णधार एल्वेरा ब्रिटो हिने 60 च्या दशकात हॉकी विश्वात आपली नाव सिद्ध केले होती. मंगळवारी सकाळी बेंगळुरू येथे त्यांचे निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी एल्वेरा ब्रिटो यांनी अखेरचा श्वास घेतला.

एल्वेरा आणि त्यांच्या दोन बहिणी रिटा आणि माई या महिला हॉकीमध्ये सक्रिय होत्या. 1960 ते 1967 दरम्यान कर्नाटककडून हॉकी खेळल्या होत्या, त्यादरम्यान तिने तीन बहिणींसह सात राष्ट्रीय विजेतेपदे जिंकली आहे. एल्वेराला 1965 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारताकडून ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि जपानविरुद्ध खेळल्या आहे. (india women hockey captain Elvera Britto passes away)

हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोंबम यांनी देखील एल्वेरा ब्रिटो यांना श्रद्धांजली वाहिली म्हणाले, एल्वेरा ब्रिटोच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. तिने महिला हॉकीमध्ये बरेच काही मिळवून दिल आहे. आता ही प्रशासक म्हणून राज्य खेळाची सेवा चालू आहे. हॉकी इंडिया आणि संपूर्ण हॉकी बिरादरीच्या वतीने आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती सहानभूती व्यक्त करत आहे.

Web Title: India Women Hockey Captain Elvera Britto Passes Away Hockey News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :hockey
go to top