कसोटीतील धमाक्यानंतर शफालीच्या नजरा वनडे सामन्यावर

भारतीय महिला संघ इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
कसोटीतील धमाक्यानंतर शफालीच्या नजरा वनडे सामन्यावर

इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पणात धमाकेदार खेळीनंतर आता तोच तोरा वनडेत दाखवण्यासाठी शफाली वर्मा सज्ज झालीये. भारतीय महिलांनी इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते. या सामन्यात शफाली वर्माने दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली. पहिल्या डावात अवघ्या 4 धावांनी शफालीचं शतक हुकले होते. कसोटीप्रमाणेच आता ती वनडेत धमाकेदार पदार्पण करण्यास उत्सुक आहे. भारतीय महिला संघ इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. रविवारपासून या मालिकेला सुरुवात होत आहे.

22 टी-20 सामने खेळलेल्या शफाली वर्माला घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात संघात स्थान मिळाले नव्हते. भारतीय महिला संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-1 अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर शफाली वर्माला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी संघात स्थान मिळाले. तिने भारतीय डावाची दमदार सुरुवातही करुन दिली. त्यामुळेच इंग्लंडच्या मैदानातून ती आता वनडे पदार्पण करताना दिसू शकेल.

कसोटीतील धमाक्यानंतर शफालीच्या नजरा वनडे सामन्यावर
श्रीलंका दौऱ्यापूर्वी धवन-भुवीमध्ये दिसला फुटबॉल फिव्हर

शफालीने कसोटीतील पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात 96 तर दुसऱ्या डावात 63 धावांची खेळी केली होती. तिच्या या खेळीकडे टीम मॅनेजमेंट निश्चितच दुर्लक्ष करणार नाही. सध्याच्या घडीला धमाकेदार खेळी करणारी शफाली वर्मा ही भारतीय संघाची मोठी ताकद बनून नावारुपाला येत आहे. तिच्याशिवाय स्मृती आणि हरमनप्रित कौर यांच्या भात्यातही फटकेबाजी करण्याची क्षमता आहे.

कसोटीतील धमाक्यानंतर शफालीच्या नजरा वनडे सामन्यावर
विराट सेनेच्या पराभवानंतर ऑस्टेलियन कॅप्टनचा माफीनामा

बचावफळीत पूनम राउत आणि कर्णधार मिताली राज यांच्यावर संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी असेल. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ 235-240 दरम्यान धावसंख्या उभारुन यजमान संघाला गोत्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असेल. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन देण्याची अपेक्षा आहे. या दोघींनी चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर पुनम राउतला आपल्या शैलीत बदल करुन स्ट्राइक रेट वाढवून खेळावे लागेल. तिच्यापाठोपाठ हरमनप्रित कौर धावगती वाढवण्याची जबाबदारी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com