India W vs Australia W
esakal
India Women face Australia in the ODI series decider at Delhi : स्मृती मानधनाच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन महिला संघावर दमदार विजय मिळवत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता भारत व ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये अखेरचा एकदिवसीय सामना आज (ता. २०) नवी दिल्लीत रंगणार आहे. भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध अद्याप एकही एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही.