'करो वा मरो' लढतीत भारतीय महिला संघाची दमदार सुरुवात

India Women vs South Africa Women
India Women vs South Africa Women Sakal News

India Women vs South Africa Women : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजनं (Mithali Raj) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पाच वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळणाऱ्या झुलन गोस्वामीशिवाय पहिल्यांदाच टीम इंडिया मैदानात उतरलीये. शफाली वर्मा (Shafali Verma) आणि स्मृती मानधना (Smriti Mandhana) या जोडीनं भारतीय संघाच्या डावाला दमदार सुरुवात करुन दिली. साखळी फेरीतील ही शेवटची आणि अंतिम लढत असून सेमी फायनलचे तिकीट पक्के करण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे. दक्षिण आफ्रिकेनं याआधीच सेमी फायनल गाठली आहे.

शफाली वर्माने सामन्यात आक्रमक तोऱ्यात बॅटिंगला सुरुवात केली. तिच्या आक्रमक अंदाजातील फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने पहिल्या 10 षटकात 68 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला स्मृती मानधना संयमी खेळ करत तिला उत्तम साथ देत असल्याचे पाहायला मिळत आहे. सलामीची बॅटर शफाली वर्मानं 40 व्या चेंडूवर खणखणीत चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. वर्ल्ड कप स्पर्धेत सुरुवातीला संघर्ष करत असलेल्या शफालीला महत्त्वपूर्ण सामन्यात सूर गवसला आहे. तिची ही खेळी भारतीय संघासाठी सेमी फायनलचे दरवाजे उघडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

India Women vs South Africa Women
CSK vs KKR : जॅक्सनमध्ये सचिन तेंडुलकरनं पाहिला धोनी

भारतीय महिला संघाने सलामीच्या लढतीत पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेची दमदार सुरुवात केली. पण त्यानंतर यजमान न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडीज विरुद्ध मिताली ब्रिगेडनं स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्याच्या इराद्याने दुसरे पाऊल टाकले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवाने पुन्हा टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली. बांगलादेश विरुद्ध विजय नोंदवत टीम इंडियाने खात्यात 6 गुणांची नोंद केली. आता दक्षिण आफ्रिके विरुद्धचा सामना जिंकून सेमी फायनलच तिकीट पक्क करण्यासाठी भारतीय महिला संघ प्रयत्नशील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com