CSK vs KKR : जॅक्सनमध्ये सचिन तेंडुलकरनं पाहिला धोनी

Sachin Tendulkar praise on Sheldon Jacksons performance
Sachin Tendulkar praise on Sheldon Jacksons performance Sakal

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings ) नमवत स्पर्धेत विजयी सलामी दिलीये. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात कोलकाताच्या संघाने बॉलिंग, फिल्डिंग आणि बॅटिंग तीन क्षेत्रात उत्तम कामगिरी करुन दाखवली. कोलकाताचा विकेट किपर शेल्डन जॅक्सन ( Sheldon Jackson) याने यष्टीमागील कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) चेन्नई सुपर किंग्जचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण जॅक्सनच्या चपळाईमुळे उथप्पाच्या खेळीला ब्रेक लागला. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर शेल्डन जॅक्सनने कमालीचं स्टम्पिंग केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar ) त्याचे कौतुक केले आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटच्या माध्यमातून सौराष्ट्रच्या विकेट किपर बॅटरचे कौतुक केल आहे. त्याची चपळाई पाहून धोनी आठवला, असा उल्लेख सचिनने आपल्या ट्विटमध्ये केलाय. सचिनशिवाय युवराज सिंगनेही त्याचा खेळ निरखून पाहिला. एवढेच नाही तर त्याला खास सल्लाही दिलाय. फिरकीपटू गोलंदाजी करत असला तरी हेल्मेट वापरत जा. तुझी क्षमता उत्तम असून तू सुरक्षित खेळावेस अशी भावना युवीनं व्यक्त केलीये.

मुंबईतील वानखेडेच्या मैदानात कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 10 षटकात कोलकाताने चेन्नईचा निम्मा संघ गारद केला. गतविजेता शंभर तरी करु शकेल का? असा प्रश्न निर्माण झाला असताना धोनीनं दमदार अर्धशतक केलं. त्याच्या खेळीच्या जारावर चेन्नईन निर्धारित 20 षटकात 131 धावांपर्यंत मजल मारली. पण ही धावसंख्या तोकडी पडली. कोलकाताकडून उमेश यादवने Umesh Yadav दोन विकेट्स घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com