

INDIA WOMEN HOCKEY WINS GOLD AFTER 44 YEARS
esakal
INDIA WOMEN HOCKEY WINS GOLD AFTER 44 YEARS: आशियाई खेळांमध्ये पुन्हा एकदा भारताच्या लेकींनी हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. ४४ वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने हे सुवर्णपदक आपल्या नावावर केलं आहे.
१९८२ नंतर मिळालेल्या या पदकाचं महत्त्व भारतीय संघासाठी नक्कीच खास आहे. भारताच्या लेकींनी चीनला १-० ने नामवत हा सामना आपल्या नावावर केला आहे. या सुवर्ण विजयासोबतच भारतीय महिलांनी लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवली आहे.