Asian Games 2023 : भारताने ठोकला 'सुवर्ण' शड्डू; इराणची कडवी झुंज मोडून काढत जिंकून दिलं गोल्ड

Asian Games Kabaddi
Asian Games Kabaddiesakal

Asian Games 2023 : भारताने एशियन गेम्समध्ये भारतीय पुरूष कबड्डी संघाने सुवर्ण कमगिरी करत भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 27 वर नेली. भारताने इराणचे कडवे आव्हान मोडून काढत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. शेवटच्या सेकंदापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात भारताने इराणचा 33 - 29 असा पराभव केला. भारताने गेल्या एशियन गेम्समधील पराभवाचे उट्टे काढत इराणकडून सुवर्ण पदक हिसकावून घेतले.

सामना सुरू झाला त्यावेळी भारतीय संघ पहिल्या हाफमध्ये 6 - 9 असा पिछाडीवर होता. मात्र भारतीय संघाने आपला खेळ उंचावत पहिला हाफ संपेपर्यंत 17 - 13 अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या हाफमध्ये देखील इराणने भारताला चांगलीच टक्कर दिली. नेक टू नेक सुरू असलेल्या सामन्यात इराणने 25 - 25 अशी बरोबरी देखील साधली होती. मात्र सामना संपायला शेवटची 5 मिनिटे शिल्लक असताना भारताने 28 - 26 अशी आघाडी घेतली.

मात्र इराणने भारताचे शेवटपर्यंत टेन्शन वाढवले होते. त्यांनी 28 - 28 अशी बरोबरी साधली. मात्र याचवेळी भारताच्या पवनच्या डू ऑर डाय रेडवेळी गोंधळ झाला. पवनने इराणच्या कोणत्याही बचावपटूने स्पर्ष करण्यापूर्वी ऑऊट ऑफ लाईन गेल्याचा दावा केला.

यानंतर रेफ्रीने भारत आणि इराण या दोघांनाही एक एक गुण दिला. मात्र यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षकांनी वाद घातला. त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता.

अखेर अवघी काही मिनिटे शिल्लक राहिलाला सामना पुन्हा सुरू झाला अन् भारताने गेल्या एशियन गेम्समधील पराभवाचे उट्टे काढले. भारताने 33 - 29 असा सामना जिंकत सुवर्ण पदक जिंकले. भारतीय महिला कबड्डीपटूंनी देखील सुवर्ण पदक पटकावले होते.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com