
Women’s Asian Champions Trophy 2024: महिला आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने पटकावले आहे. भारतीय संघाने बुधवारी (२० नोव्हेंबर) अंतिम सामन्यात चीनला १-० अशा फरकाने पराभवाची धुळ चार सलग दुसऱ्यांदा, तर एकूण तिसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकावला आहे.
भारतीय संघ पाचव्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना खेळत होता. भारताने तिसऱ्यांदा विजेतेपद पटाकावले आहे, तर दोन वेळा भारतीय संघ उपविजेता राहिला होता. भारताने यापूर्वी २०१६ आणि २०२३ या वर्षी झालेल्या महिला आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते.
बुधवारी भारताकडून दीपिकाने एकमेव विजयी गोल केला आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. चीनला याआधी साखळी फेरीतही भारताने पराभूत केलं होतं. आता अंतिम सामन्यातही भारतीय संघाने चीनला पराभवाचा धक्का दिला.