Indian Archers Stranded 10 Hours at Dhaka Airport
esakal
आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय तिरंदाजांचे मायदेशी परतताना हाल झाले. बांगलादेशमधील हिंसेचा परिणाम भारतीय तिरंदाजांवर झाला. भारताच्या ११ जणांच्या चमूला तब्बल १० तास विमानतळावर थांबावे लागले. त्यानंतर खिडकी नसलेल्या बसमधून त्यांना प्रवास करावा लागला. अस्वच्छ धर्मशाळेमध्ये त्यांना वास्तव्याला जागा देण्यात आली. भारतीय तिरंदाजांचा जीव याप्रसंगी धोक्यात होता.