French Open Badminton Tournament
French Open Badminton Tournamentsakal

French Open Badminton Tournament : सात्विक-चिरागला अजिंक्यपदाची आस ; फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा

सात्विक साईराज रंकीरेड्डी- चिराग शेट्टी या भारताच्या जोडीला मागील तीन स्पर्धांमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेतेपदाची हुलकावणी मिळत असलेल्या या पुरुष दुहेरीतील जोडीला उद्यापासून (ता. ४) सुरू होत असलेल्या फ्रेंच ओपन सुपर ७५० या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपदाची आस लागली असणार आहे.

पॅरिस : सात्विक साईराज रंकीरेड्डी- चिराग शेट्टी या भारताच्या जोडीला मागील तीन स्पर्धांमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेतेपदाची हुलकावणी मिळत असलेल्या या पुरुष दुहेरीतील जोडीला उद्यापासून (ता. ४) सुरू होत असलेल्या फ्रेंच ओपन सुपर ७५० या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपदाची आस लागली असणार आहे. या जोडीने २०२२मध्ये या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली होती. आता दोन वर्षांनंतर त्याची पुनरावृत्ती होते का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सात्विक साईराज रंकीरेड्डी- चिराग शेट्टी या जोडीला चीन मास्टर्स (नोव्हेंबर), मलेशिया ओपन व इंडिया ओपन (जानेवारी) या तीन स्पर्धांच्या अंतिम फेरीत हार पत्करावी लागली. पॅरिस ऑलिंपिक डोळ्यांसमोर ठेवून भारताची ही जोडी यापुढील वाटचाल करण्याचा प्रयत्न करील यात शंका नाही.

French Open Badminton Tournament
Ranji Trophy : मुंबई ४८व्यांदा रणजी अंतिम फेरीत ; तमिळनाडूवर तीन दिवसांच्या आत डावाने विजय

सिंधूसमोर तगडे आव्हान

पी. व्ही. सिंधू हिने दुखापतीवर मात करीत आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत झोकात पुनरागमन केले; पण शाह आलम येथे झालेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीयस्तरावरील दिग्गज खेळाडूंचा समावेश नव्हता. मात्र, फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीत स्टार खेळाडूंचा सहभाग असणार आहे. त्यामुळे सिंधूसमोर तगडे आव्हान असणार आहे. सलामीच्या लढतीत मिचेल लि हिच्याशी दोन हात केल्यानंतर सिंधूला कॅरोलिना मरीन हिचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

प्रणोय, लक्ष्य, श्रीकांत लढणार

पुरुष एकेरीत भारताची मदार एच. एस. प्रणोय, लक्ष्य सेना, किदांबी श्रीकांत या अनुभवी खेळाडूंच्या खांद्यावर असणार आहे. एच. एस. प्रणोयला चीनच्या लू झू याचा सामना करावा लागेल. लक्ष्य सेन याला जपानच्या कांता सुनेयामा याला लढत द्यावी लागेल. किदांबी श्रीकांत याला चीन तैपईच्या चाऊ चेन याचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. प्रियांशू राजवत याच्यासमोर व्हिक्टर ॲक्सेलसेन याचे कडवे आव्हान असणार आहे. प्रियांशूने व्हिक्टर याला पराभूत केल्यास सलामीलाच धक्कादायक निकाल लागला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com