निखात झरीन नावाचं वादळ पोहचलं वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये | Indian Boxer Nikhat Zareen Reached Women's World Boxing Championships final | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Boxer Nikhat Zareen Reached Women's World Boxing Championships final

निखात झरीन नावाचं वादळ पोहचलं वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये

नवी दिल्ली : भारतीची महिला बॉक्सर निखात झरीनने (Nikhat Zareen) महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या (Women's World Boxing Championships) फायनलमध्ये प्रवशे केली आहे. तिने ब्राझीलच्या कॅरोलिन डे अल्मैडाचा पराभव केला. हा सामना इस्तांबूलमध्ये झाला होता. झरीन ही माजी ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे. आजच्या 52 किलो वजनीगटातील सामन्यात तिने शांत चित्ताने प्रतिस्पर्धी बॉक्सर कॅरोलिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिने सामना 5-0 अशा एकतर्फी जिंकला. (Indian Boxer Nikhat Zareen Reached Women's World Boxing Championships final)

हेही वाचा: छोट्या मुशफिकूरचे मोठे रेकॉर्ड; असं करणारा ठरला पहिला बांगलादेशी

सहा वेळची विजेती मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएळ आणि लेखा सी या भारतीय बॉक्सरनी आतापर्यंत वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. आता हैदराबादच्या झरीनला देखील या यादीत आपले नाव कोरण्याची संधी निर्माण झाली आहे. या स्पर्धेत भारताने 2006 मध्ये सर्वात चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी भारताने आठ पदकांची कामाई केली होती. यात चार सुवर्ण आणि एक रौप्य तर तीन कांस्य पदकांचा समावेश होता.

हेही वाचा: 'दुखापतग्रस्त' टीम इंडिया निवडसमितीची डोकेदुखी वाढवणार?

हेही वाचा: IPL 2022 : हे आठ संघ गाठू शकतात प्ले ऑफ, पण कसे?

गतवर्षी भारताच्या चार बॉक्सरनी पदक जिंकले होते. यात मंजू राणीने रौप्य मेरी कोमने कांस्य पदक जिंकून आपले वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आठवे पदक नावार केले होते.

Web Title: Indian Boxer Nikhat Zareen Reached Womens World Boxing Championships Final

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Boxing
go to top