Amit Panghal : जागतिक पदक विजेता अमित पंघालचे पुनरागमन ;ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी भारतीय बॉक्सिंग संघाची घोषणा

जागतिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या अमित पंघाल याचे भारताच्या बॉक्सिंग संघात पुनरागमन झाले आहे. पॅरिस ऑलिंपिकसाठीची अखेरची पात्रता फेरी २५ मे ते २ जून या दरम्यान बँकॉक येथे होणार आहे.
Amit Panghal
Amit Panghalsakal

नवी दिल्ली : जागतिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या अमित पंघाल याचे भारताच्या बॉक्सिंग संघात पुनरागमन झाले आहे. पॅरिस ऑलिंपिकसाठीची अखेरची पात्रता फेरी २५ मे ते २ जून या दरम्यान बँकॉक येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी करण्यात आली. पात्रता फेरीसाठी भारताचा नऊ संघांचा चमू निवडण्यात आला असून यामध्ये सात पुरुष व दोन महिला खेळाडूंचा समावेश आहे.

मागील महिन्यात इटलीमध्ये ऑलिंपिकसाठीची पात्रता फेरी पार पडली. या स्पर्धेतून भारताच्या एकाही खेळाडूला ऑलिंपिकची पात्रता मिळवता आली नाही. त्यानंतर भारतीय बॉक्सिंग संघाचे उच्चस्तरीय संचालक बर्नाड ड्यून यांनी पदावरून माघार घेतली. याच कारणामुळे आता बँकॉक येथे होणार असलेल्या पात्रता फेरीसाठी संघात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. पाच खेळाडूंना आपले स्थान गमवावे लागले आहे.

पाच खेळाडूंना डच्चू

भारताच्या बॉक्सिंग संघातून पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे. जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक जिंकलेले दीपक भोरिया (५१ किलो वजनी गट) व मोहम्मद हुसामुद्दीन (५७ किलो वजनी गट), सहा वेळा आशियाई पदक जिंकलेला शिव थापा (६३.५ किलो वजनी गट), राष्ट्रीय विजेता लक्ष्य चहर (८० किलो वजनी गट) व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ब्राँझपदक पटकावलेला जास्मिन लामबोरिया यांनी भारतीय संघातील स्थान गमावले आहे. सचिन सिवाच, अभिनाष जमवाल, अभिमन्यू लॉरा, निशांत देव, संजीत, नरेंदर बेरवाल या खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

Amit Panghal
IPL 2024 RR vs PBKS : राजस्थानच्या विजयाची पंचमी ; पंजाबवर तीन विकेट राखून मात

चार महिला खेळाडू पात्र

आतापर्यंत पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताचे चारच खेळाडू पात्र ठरले आहेत. यामध्ये चार महिला खेळाडूंचा समावेश आहे. निखत झरीन (५० किलो वजनी गट), प्रीती पवार (५४ किलो वजनी गट), परवीन हुडा (५७ किलो वजनी गट), लवलीना बोर्गोहेन (७५ किलो वजनी गट) या चार महिला खेळाडूंनी ऑलिंपिकचे तिकीट बुक केले आहे, पण भारताच्या एकाही पुरुष खेळाडूला ऑलिंपिकची पात्रता मिळवता आलेली नाही. आगामी पात्रता फेरीत अंकुशिता बोरो व अरुंधती चौधरी या दोन महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

भारताचा संघ : पुरुष विभाग- अमित पंघाल (५१ किलो वजनी गट), सचिन सिवाच ज्युनियर (५७ किलो वजनी गट), अभिनाष जमवाल (६३.५ किलो वजनी गट), निशांत देव (७१ किलो वजनी गट), अभिमन्यू लॉरा (८० किलो वजनी गट), संजीत (९२ किलो वजनी गट), नरेंदर बेरवाल (९२ पेक्षा अधिक किलो वजनी गट). महिला विभाग- अंकुशिता बोरो (६० किलो वजनी गट), अरुंधती चौधरी (६६ किलो वजनी गट).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com