
भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेश याने फिडे (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना) क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच त्याने २७८४ रेटिंगची कमाई करीत भारताकडून सर्वोत्तम कामगिरीचीही नोंद केली आहे. याचसोबत त्याने भारताच्या अर्जुन एरीगेसी याला मागे टाकले आहे. अर्जुन याला २७७९.५ रेटिंगची कमाई करता आली आहे.