esakal | हरभजन सिंग म्हणाला, 'दादा, आता यांची बदली कर'

बोलून बातमी शोधा

Harbhajan-Singh

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्काचे चहाचे कप निवड समिती सदस्य उचलत होते, असे वक्तव्य माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केले होते.

हरभजन सिंग म्हणाला, 'दादा, आता यांची बदली कर'
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपला सुरवात झाल्यापासून भारतीय संघाची कामगिरीही उंचावली आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारात टीम इंडिया दमदार कामगिरी करत आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि आता बांगलादेश या संघाविरुद्ध मोठ्या विजयाची नोंद भारतीय संघाने केली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आणि त्यात आता बीसीसीआयची सगळी सूत्रं सौरव गांगुली यांच्याकडे गेल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये जणूकाही उत्साहच संचारला आहे. गांगुली यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी आता निवड समितीतही बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये भारताचा माजी गोलंदाज हरभजनसिंग आघाडीवर आहे.

INDvBAN : 'दादा'चं कौतुक पडलं विराटला भारी; काय आहे नेमकं प्रकरण!

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघातून यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या निवडीवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही ट्विट करत या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष्य वेधले. याची दखल घेत हरभजनने दादाला म्हणजे बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीला निवड समिती बदलण्याची विनंती केली आहे. 

हरभजन म्हणाला, निवड समितीतील सदस्य संजूची परीक्षा घेत आहेत, पण आता या समितीतही बदल करण्याची वेळ आली आहे. मला विश्वास आहे की दादा नक्कीय योग्य बदल करेल.

दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या जागी ऋषभ पंतला खेळविण्यात येत आहे. मात्र, त्याच्या कामगिरीत सुधारणा दिसून येत नसल्याने संजूला संधी देण्यात यावी, अशी मागणी क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे. संजूला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आले होते. मात्र, त्याला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

कसोटी क्रिकेटमधील नवीन बदलांना यश मिळो : कपिल देव

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्काचे चहाचे कप निवड समिती सदस्य उचलत होते, असे वक्तव्य माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केले होते. तर एमएसके प्रसाद यांनी महेंद्रसिंह धोनीबाबत केलेल्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी चांगलाच आवाज उठवला होता.

मनू भाकरचा विश्वकरंडकात 'सुवर्ण' वेध