Pankaj Advani: भारताच्या पंकज अडवाणीची जागतिक स्तरावर दखल, हॉल ऑफ फेममध्ये झाला समावेश

Pankaj Advani: भारताचा दिग्गज बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून त्याची जागतिक स्तरावरही दखल घेण्यात आली आहे.
Pankaj Advani
Pankaj AdvaniX/PankajAdvani247

Pankaj Advani News: भारताचा दिग्गज बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याचा समावेश चीनमधील शांगराव शहरातील वर्ल्ड बिलियर्ड्स संग्रहालयातील हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला आहे.

पंकज अडवाणीने आत्तापर्यंत मोठे यश मिळवले आहे. त्याने गेल्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये विक्रमी 26व्यांदा आयबीएसएफ वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशीपचे विजेतेपद जिंकले होते.

Pankaj Advani
Pankaj Advani : पंकज अडवाणीने पुन्हा केली कमाल; जागतिक बिलियड्‌र्स अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर उमटवली मोहोर

त्याने नोव्हेंबरमध्ये बिलियर्सच्या या लाँग फॉरमॅटच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताच्याच सौरव कोठारीला पराभूत केले होते. यासह 9व्यांदा बिलियर्सच्या या लाँग फॉरमॅटचे पंकजने विजेतेपद जिंकले होते.

पंकज अडवाणीने हॉल ऑफ फेममध्ये सामील केल्यानंतर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.

तसेच त्याने म्हटले 'वर्ल्ड बिलियर्ड संग्रहालयात हॉल ऑफ फेममध्ये माझा समावेश केल्याबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे. या अभूतपूर्व प्रवासात मला खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला, ज्यासाठी मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे.'

त्याने पुढे म्हटले, 'आपल्या देशाचे आणि संपूर्ण बिलियर्स कम्युनिटीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मला आनंद आहे. मी यापुढेही या खेळाप्रती माझे समर्पण आणि मेहनत कायम ठेवेल. सर्वांना अभिमान वाटावा यासाठी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्नही कायम असेल.'

पंकज अडवाणीने अनेकदा भारताचे नाव बिलियर्ड्समध्ये उंचावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com