Kamalpreet Kaur : भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर तीन वर्षांची बंदी

Indian Discus Thrower Kamalpreet Kaur Banned
Indian Discus Thrower Kamalpreet Kaur Banned esakal

Kamalpreet Kaur Ban For Doping : जागतिक अॅथलेटिक्सची अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट(AIU) ने भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर तीन वर्षाची बंदी घातली. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या कमलप्रीतबाबतचा हा निर्णय AIU ने आज ट्विट करून सांगितला. पंजाबच्या या 26 वर्षाच्या थाळीफेकपटू कौरच्या नमुन्यात प्रतिबंधित स्टॅनोजोलोल द्रव्य आढळून आले होते. यामुळे तिच्यावर तीन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. AIU ने आपल्या अहवालात सांगितले की कौरचे नमुने या वर्षीच्या 7 मार्चला पटियाला येथे घेण्यात आले होते. यानंतर हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.

Indian Discus Thrower Kamalpreet Kaur Banned
David Warner : वर्ल्डकपपूर्वीच डेव्हिड वॉर्नरच्या डोक्याला झाली दुखापत

कमलप्रीत कौरवरील ही तीन वर्षाची बंदी 29 मार्च 2022 पासून सुरू होईल. आता पुढची तीन वर्षे कौर कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. याचबरोबर कौरने 7 मार्चनंतर जर कोणत्या स्पर्धेत भाग घेतला असेल तर त्याचा निर्णय मान्य केला जाणार नाही. कौरला 29 मार्चला AIU द्वारे तातपुरते निलंबित केले होते. कौरच्या चाचणीत आढळू आले की तिने फेब्रवारी महिन्यात दोन प्रोटीन सप्लीमेंटचे दोन चमचे घेतले होते. यामध्ये स्टॅनोजोलोलचे अंश सापडला आहे.

Indian Discus Thrower Kamalpreet Kaur Banned
DDCA Ground Staff : मालिका विजयाचं शिखर 'या' लढवय्यांमुळे झाले सर

कमलप्रीत कौरने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिने पात्रता फेरीत 64 मीटरची सर्वोत्तम फेकी केली होती. ती 31 खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानावर होती. फायनलमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात होती. मात्र पात्रता फेरीतील दमदार कामगिरी ती अंतिम फेरीत करू शकली नाही. तिने 63.7 मीटर सर्वोत्तम फेकी केली. याबरोबरच ती यादीत सहाव्या स्थानावर राहिली होती. कौरची वैयक्तीक सर्वोत्त कामगिरी ही 66.59 मीटर इतकी होती. जर अशीच कामगिरी कौरने ऑलिम्पिक फायनलमध्ये केली असती तर तिने कांस्य पदक जिंकले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com