DDCA Ground Staff : मालिका विजयाचं शिखर 'या' लढवय्यांमुळे झाले सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DDCA Ground Staff Curators
चार दिवस दिल्लीत तुफान पाऊस पडत होता. त्यात सामन्यादिवशी सकाळी देखील पावसाने हजेरी लावली होती. #DDCAGroundStaff #INDvsSA #INDvSA #3rdODI #ODI

DDCA Ground Staff : मालिका विजयाचं शिखर 'या' लढवय्यांमुळे झाले सर

DDCA Ground Staff Curators : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात पाऊस खोडा घालणार असे वाटत होते. अरूण जेटली स्टेडियमवर सामन्याच्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत संपूर्ण 50 - 50 षटकांचा सामना होईले असे कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. गेली चार दिवस दिल्लीत तुफान पाऊस पडत होता. त्यात सामन्यादिवशी सकाळी देखील पावसाने हजेरी लावली होती. यामुळे ग्राऊंड स्टाफसमोर मैदान खेळण्यायोग्य तयार करण्याचे मोठे आव्हान होते.

हेही वाचा: Urvashi Rautela : वर्ल्डकप धोक्यात! उर्वशी रौतेला अन् मांग में सिंदूर...सोशलवर एकच चर्चा

मात्र दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा ग्राऊंड स्टाफ आणि मुख्य क्युरेटर अंकित दत्ता यांनी बीसीसीआयचे क्युरेटर सुनिल चौहान यांच्या मदतीने चमत्कार घडवला. त्यांनी दोन तास पडलेल्या सूर्यप्रकाशाच्या जोरावर मैदान तयार केले. सामना 45 मिनिटे उशिरा सुरू झाला मात्र सामना संपूर्ण 50 षटकांचा खेळवण्यात आला. एकाही षटकाचा खेळ वाया गेला नाही.

34 वर्षाचे दत्ता हे गेली सात वर्षे अरूण जेटली (फिरोजशाह कोटला) स्टेडियमच्या खेळपट्टीची देखभाल करत आहेत. त्यांनी खेळपट्टीचे नेचर बदलण्यासाठी खूप कष्ट उपसले आहेत. यापूर्वी ही खेळपट्टी संथ आणि चेंडू खाली राहणारी होती. मात्र आता या खेळपट्टीचा गुणधर्म बदलला आहे. याचबरोबर ऑफ सिजनमध्ये आऊट फिल्डच्या ड्रेनेज व्यवस्थेत सुधारणा करण्यात आली होती. याचे फळ मंगळवारच्या सामन्यात पहायला मिळाले.

हेही वाचा: Shardul Thakur : मुंबई विमानतळावर शार्दुल ठाकूरने मागितली मदत, हरभजन आला धावून

सामना लो स्कोरिंग झाला. मात्र खेळपट्टी अनेक दिवस झाकून ठेवल्यामुळे तिच्यावर गोलंदाजांचा बोलबाला राहिला. सामना संपत असताना चेंडू बॅटवर चांगल्या पद्धतीने येत होता. याचबरोबर नॉर्त्जेचा चेंडू देखील चांगला बाऊन्स होत विकेटकिपरपर्यंत जात होता.