Indian Football Crisis
esakal
क्रीडा
क्रिकेटप्रमाणेच फुटबॉलही लोकप्रिय होणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, क्रीडा मंत्रालयात होणार महत्त्वपूर्ण बैठक
Indian Football Crisis & Govt Intervention : येत्या ३ डिसेंबरला केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविय हे भारतीय फुटबॉलशी संबंधितांशी भेट घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघटना, व्यावसायिक भागीदार व विविध क्लब्स पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
भारतातील फुटबॉल या खेळाच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भारतातील फुटबॉल या खेळाचा पाय यंदाच्या मोसमात खोलात गेला आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून भारतातील फुटबॉल रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भात येत्या ३ डिसेंबरला केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविय हे भारतीय फुटबॉलशी संबंधितांशी भेट घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघटना, व्यावसायिक भागीदार व विविध क्लब्स पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
